शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक; पंचायतींसाठी 'रोडमॅप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 08:27 IST

स्वच्छ, पारदर्शक प्रशासनासाठी कडक निर्देश; कचरा व्यवस्थापन, डिजिटल सेवा आणि लोकसहभागाचा दिला कानमंत्र

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील पंचायत व्यवस्था अधिक सक्षम, कार्यक्षम आणि खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करण्यासाठी राज्य सरकारने निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत पंचायत प्रशासनाला ठोस 'कानमंत्र' देण्यात आला.

या महत्त्वपूर्ण बैठकीला पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच पंचायत प्रशासनातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील सर्व पंचायतींमध्ये सुरू असलेल्या सुधारणांची अंमलबजावणी, त्यांची सद्यस्थिती आणि आगामी दिशा यावर सखोल आणि परिणामकारक चर्चा करण्यात आली.

बैठकीत विशेषतः कचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम, शाश्वत आणि परिणामकारक करण्यावर ठाम भर देण्यात आला. गावागावात स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कचऱ्याचे वैज्ञानिक वर्गीकरण, पुनर्वापर आणि दीर्घकालीन शाश्वत व्यवस्थापन यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

मुख्यमंत्री सावंत यांनी "स्वच्छ गोंय, 66 नितळ गोंय" ही संकल्पना केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पंचायत स्तरावर ठोस कृती आराखडे तयार करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. प्रत्येक पंचायतीने आपल्या स्थानिक गरजांचा अभ्यास करून स्वतंत्र, परिणामकारक आणि दीर्घकालीन कचरा व्यवस्थापन योजना तयार करावी, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

'त्रिसूत्री'वर बैठकीत चर्चा...

या बैठकीतून राज्य सरकारने स्वच्छता, शाश्वत विकास आणि लोकाभिमुख प्रशासन या त्रिसूत्रीवर ठाम भूमिका घेत ग्रामशासन अधिक बळकट करण्याचा स्पष्ट निर्धार व्यक्त केला. या निर्णयांमुळे गोव्यातील ग्रामीण भागात स्वच्छता व्यवस्थापन अधिक सुधारेल, प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनेल, तसेच नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक आणि दीर्घकालीन बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बैठकीत पंचायत प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी विविध सुधारणा राबवण्यावरही सखोल चर्चा झाली. नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावणे, तक्रार निवारण यंत्रणा अधिक वेगवान आणि परिणामकारक करणे, तसेच डिजिटल माध्यमांचा वापर वाढवून प्रशासन अधिक सुलभ आणि लोकाभिमुख बनवण्यावर सरकारचा स्पष्ट भर असल्याचे दिसून आले.

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनीही बैठकीत आपले मत मांडताना सांगितले की, राज्यातील पंचायतींना आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाकडून दिले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम आणि मजबूत केल्याशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

गोव्यातील प्रत्येक नागरिकांना मुलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमात नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे, व्यापक जनजागृती मोहिमा राबवणे आणि स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

English
हिंदी सारांश
Web Title : CM Pramod Sawant Holds High-Level Meeting; Roadmap for Panchayats

Web Summary : Goa government focuses on strengthening Panchayats with a roadmap emphasizing waste management, cleanliness, and efficient administration. Chief Minister Sawant directs action plans for 'Clean Goa' with modern technology and public participation. The government aims for transparent, citizen-centric governance and sustainable development in rural areas.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत