सडा, म्हापसा तुरुंग बंद करा!

By Admin | Updated: December 2, 2015 01:31 IST2015-12-02T01:31:46+5:302015-12-02T01:31:56+5:30

पणजी : गोव्यातील सडा तुरुंग व म्हापसा न्यायालयीन तुरुंग बंद करण्याची शिफारस वेल्लोर तुरुंग अकादमीने आपल्या

Close the road, close the Mapusa! | सडा, म्हापसा तुरुंग बंद करा!

सडा, म्हापसा तुरुंग बंद करा!

पणजी : गोव्यातील सडा तुरुंग व म्हापसा न्यायालयीन तुरुंग बंद करण्याची शिफारस वेल्लोर तुरुंग अकादमीने आपल्या सर्वेक्षण अहवालात केली आहे. या तुरुंगांची दुरुस्ती करा आणि नंतरच ते वापरा, असे अकादमीच्या अहवालात म्हटले आहे. दोन महिन्यांपूर्वी गोव्यातील तुरुंगांचे सर्वेक्षण करण्यात आले होते, त्याचा अहवाल अकादमीने तुरुंग प्रशासनाला सादर केला आहे.
तुरुंग प्रशासन सुधारणांचा एक भाग म्हणून वेल्लोर तुरुंग अकादमीकडून गोव्यातील तीनही तुरुंगांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या या सर्वेक्षणात सडा, कोलवाळ आणि म्हापसा येथील न्यायालयीन तुरुंगाला या पथकाने भेटी देऊन पाहणी केली होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वेक्षण अहवाल अकादमीकडून पाठविण्यात आला. त्यात सडा तुरुंगातील आणि म्हापसा तुरुंगातील गैरसोयींचा पाढा वाचण्यात आला आहे. जोपर्यंत या तुरुंगांचे नूतनीकरण करण्यात येत नाही, तोपर्यंत हे तुरुंग बंद ठेवण्यात यावेत आणि त्यातील कैदी कोलवाळ तुरुंगात स्थलांतरित करण्यात यावेत, अशी शिफारस करण्यात आली आहे.
तुरुंग प्रशासन हाताळण्याइतपत गोव्यात प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्यामुळे गोव्यात तुरुंग प्रशासनाचे स्वतंत्र केडर सुरू करण्यात यावे, अशी शिफारसही अहवालात करण्यात आली आहे. हा अहवाल तुरुंग प्रशासनाकडून सरकारला सादर केला जाणार असल्याची माहिती तुरुंग महानिरीक्षका-लयातील सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Close the road, close the Mapusa!