अतिरेकी विधानांबाबत चर्च चिंतित!
By Admin | Updated: December 29, 2015 01:48 IST2015-12-29T01:47:53+5:302015-12-29T01:48:09+5:30
पणजी : सार्र्वजनिक व्यासपीठांवरून अलिकडे काहीजणांकडून केल्या जात असलेल्या आक्रमक व अतिरेकी स्वरूपाच्या

अतिरेकी विधानांबाबत चर्च चिंतित!
पणजी : सार्र्वजनिक व्यासपीठांवरून अलिकडे काहीजणांकडून केल्या जात असलेल्या आक्रमक व अतिरेकी स्वरूपाच्या विधानांबाबत गोव्यातील चर्च संस्थेचे प्रमुख असलेले आर्र्चबिशप फिलिप नेरी फेर्राव यांनी चिंता व्यक्त केली.
सोमवारी नाताळानिमित्त व नववर्र्षानिमित्त आर्चबिशप फेर्राव यांनी आल्तिनो येथील बिशप पॅलेसच्या संकुलात निमंत्रितांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले होते. त्या वेळी बोलताना फेर्राव म्हणाले, की बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांविरुद्ध संघटित करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी केली जाणारी भाषणे व विधाने ही चिंताजनक आहेत. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये केली जात आहेत. मात्र, अशी भाषा करणाऱ्यांना माफ करायला हवे. त्यांच्याविषयी करुणाच दाखवावी लागेल.
असहिष्णुता वाढीस लागली असून समाजात त्याचे वाईट परिणाम दिसून येत आहेत, असेही आर्र्चबिशप म्हणाले.
(खास प्रतिनिधी)