‘दि चिल्ड्रन आॅफ वॉर’ आज
By Admin | Updated: November 28, 2014 00:22 IST2014-11-28T00:19:47+5:302014-11-28T00:22:30+5:30
पणजी : अमर्याद अधिकारशाहीचे दुष्परणाम किती भयानक असू शकतात, याचे चित्रण करणारा ‘दि चिल्ड्रन वॉर’ हा मृत्युंजय देवव्रत यांचा चित्रपट इप्फीत इंडियन पॅनोरमा विभागात शुक्र वारी प्रदर्शित केला जाणार आहे

‘दि चिल्ड्रन आॅफ वॉर’ आज
पणजी : अमर्याद अधिकारशाहीचे दुष्परणाम किती भयानक असू शकतात, याचे चित्रण करणारा ‘दि चिल्ड्रन वॉर’ हा मृत्युंजय देवव्रत यांचा चित्रपट इप्फीत इंडियन पॅनोरमा विभागात शुक्र वारी प्रदर्शित केला जाणार आहे. बांग्लादेशमध्ये १६ आठवडे हाउसफुल्ल चाललेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
इफ्फीच्या दुसऱ्या टप्प्यातील चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट नव्हता; परंतु दोन दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. शुक्र वारी सकाळी ८.३० मॅकेनिज पॅलेस १ मध्ये त्याचे स्क्रिनिंग होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. बांग्लादेशमधील १९७१च्या अमानवी अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आहे. पूर्व पाकिस्तानी (बांग्लादेशी) महिलांवर बलात्कार केल्यास व ती गरोदर राहिल्यास पूर्व पाकिस्तानी स्वतंत्र राष्ट्रासाठीचा ध्यास सोडून देतील, अशा बुरसटलेल्या तर्काचा आधार घेत पाकिस्तानी सैनिकांनी पूर्व पाकिस्तानात उच्छाद मांडला होता. या अत्याचारकांडातून निर्माण झालेल्या अपत्याचा न्यायासाठीचा आक्रोष हा चित्रपटाचा गाभा आहे.
युरोपमधील प्रसारमाध्यमांच्या चर्चेत हा चित्रपट होता. रायमा सेन, फारु ख शेख, पवन मल्होत्रा, व्हिक्टर बॅनर्जी यांनी या चित्रपटात भूमिका साकरल्या आहेत.