१४९ कोटींचे प्रकल्प मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 09:20 IST2025-07-12T09:19:01+5:302025-07-12T09:20:10+5:30

साधन सुविधा विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली.

chief minister announces projects worth 149 crore | १४९ कोटींचे प्रकल्प मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

१४९ कोटींचे प्रकल्प मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: साधन सुविधा विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. या बैठकीत १४९ कोटी रुपयांच्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार केदार नाईक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक सुविधा, शहरी पुनरुज्जीवन आणि संस्थात्मक विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अनेक प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांना मान्यता दिली. या प्रकल्पांचे उद्दिष्ट नागरी सुविधा वाढवणे आणि राज्याच्या दीर्घकालीन विकासात योगदान देणे आहे. साखळी रवींद्र भवनात ३ कोटी रुपये खर्चुन देखभाल, दुरुस्ती होणार आहे.

साखळी येथे म्युनिसिपल मार्केटचे अपग्रेडेशन, सांतइस्तेव्ह पुलाची अंदाजे २१ कोटी खर्च करून पुनर्बाधणी, गोवा मेडिकल कॉलेज मध्ये ११३ कोटींचे मुलांचे वसतिगृह बांधणे, मडगावमधील जुन्या सरकारी इमारतींचा पुनर्विकास, ज्यामध्ये जुनी जिल्हाधिकारी इमारत आणि पोलिस मुख्यालय आहे तसेच व १२ कोटी रुपये खर्च करून मडगावमधील जुन्या बस स्टँडचा विकास आदी कामांचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की हे उपक्रम सार्वजनिक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, शहरी सुविधांमध्ये सुधारणा आणि गोव्यातील लोकांसाठी सुलभ, उच्च-गुणवत्तेच्या सुविधा निश्चित करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाचा भाग आहेत. विकसित गोवा २०३७ अंतर्गत राज्याच्या विकास रोडमॅपशी सुसंगत पायाभूत सुविधा प्रकल्प जलद आणि कार्यक्षमतेने राबविण्यात येत आहेत.

 

Web Title: chief minister announces projects worth 149 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.