शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त शिवगोमंतगाथा संमेलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 6:37 PM

म्हापसा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनाच्या ३५० व्या वर्षानिमित्त गोवा मराठी अकादमी आणि रवींद्र भवन साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवगोमंतगाथा हे दोन दिवसीय शिवचरित्र संमेलन साखळी-गोवा येथे आयोजित करण्यात आले

म्हापसा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनाच्या ३५० व्या वर्षानिमित्त गोवा मराठी अकादमी आणि रवींद्र भवन साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवगोमंतगाथा हे दोन दिवसीय शिवचरित्र संमेलन साखळी-गोवा येथे आयोजित करण्यात आले आहे. शनिवार, १८ व रविवार, दि. १९ नोव्हेंबर असे दोन दिवस होणा-या या संमेलनाचे उद्घाटन दि. १८ रोजी सायं. ४ वा. श्रीमंत संभाजी छत्रपती राजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.शिवाजी आणि गोमंतक यांच्यातील संबंध लोकांच्या स्मरणात राहावा यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी सभापती तसेच कार्यक्रम समितीचे अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर यांनी दिली. यावेळी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, तुषार टोपले, आनंद मयेकर, विजय तिनईकर हे उपस्थित होते. १९ नोव्हेंबर १६६७ रोजी शिवाजी महाराजांचे पहिल्यांदा गोव्यात कोलवाळ येथे आगमन झाले. त्यावेळी कोलवाळ किल्ल्यावर कब्जा असलेल्या पोर्तुगीजांवर हल्ला करुन त्यांना तेथून पिटाळून लावले. त्या किल्ल्यावर महाराजांनी दोन दिवस वास्तव्य केले. काही काळ वास्तव्य करुन पुन्हा माघारी गेल्यानंतर गोव्यात आले. त्यांनी गोव्यात नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला. सामाजिक स्थैर्य निर्माण केले. राष्ट्रवाद निर्माण केल्याचे आर्लेकर म्हणाले.महाराजांनी गोव्यात आल्यानंतर पहिल्यांदा कोलवाळ येथे दाखल झाल्याने १८ रोजी कोलवाळ येथील राममंदिरापासून साखळीपर्यंत शिवगोमंत रथ यात्रा सुरु होणार आहे. त्यानंतर दुपारी अडीच वाजता डिचोलीतील शिवाजी मैदानावरुन ही यात्रा साखळीला प्रयाण करणार आहे. त्या ठिकाणी संमेलनाचे उद्घाटन महाराजांचे चौदावे वारस श्रीमंत संभाजी छत्रपती राजे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, स्वागताध्यक्ष सभापती डॉ. प्रमोद सावंत, आमदार राजेश पाटणेकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून समन्वयक भारतीय संतसभा डॉ. संदीप महिंद्र हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराजांनी गोव्यात काबीज केलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन तसेच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन पुरातत्व विभागाच्या सहकार्याने आयोजित केले आहे. उद्घाटनानंतर शिवकल्याण राजा या महाराजांच्या जीवनावर आधारीत सांगितीक कार्यक्रम सादर होणार आहे.रविवार, दि. १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोमंतकातील कार्यवर आधारीत माहितीपट सादर होणार आहे. त्यानंतर शिवरायांची मराठी संस्कृतीला देणगी यावर डॉ. अशोक कामत यांचे व्याख्यान होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन शास्त्र या विषयावर डॉ. अविनाश मोहरिल मार्गदर्शन करतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार यावर अ‍ॅड. आनंद देशपांडे आपले विचार व्यक्त करतील. संमेलनाच्या समारोप सोहळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य याविषयावर पांडुरंग बलकवडे (पुणे) हे विचार व्यक्त करतील. समारोपाला विशेष अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रतापसिंग राणे उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :goaगोवा