प्रसन्न घोडगेंविरुद्ध आरोपपत्र
By Admin | Updated: April 11, 2015 02:19 IST2015-04-11T02:15:33+5:302015-04-11T02:19:52+5:30
पणजी : १.५० मेट्रिक टन खनिज घोटाळाप्रकरणी फसवणुकीच्या

प्रसन्न घोडगेंविरुद्ध आरोपपत्र
पणजी : १.५० मेट्रिक टन खनिज घोटाळाप्रकरणी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली खनिज वाहतूकदार प्रसन्न घोडगे व इतर तिघांविरुद्ध खाण घोटाळा प्रकरणात तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ४४४ पानांचे आरोपपत्र ठेवले आहे.
रायचूर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलेले घोडगे यांना रायपूर पोलिसांनी अन्य एका प्रकरणात अटक केली होती. खनिज घोटाळा प्रकरणात गोवा पोलिसांच्या एसआयटीकडून त्यांना १६ मार्च रोजी चौकशीसाठी ताब्यातही घेतले होते. चौकशी पूर्ण करून त्यांची रवानगी पुन्हा रायचूर सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली व शुक्रवारी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. एसआयटीकडून ही माहिती देण्यात आली. भारतीय दंडसंहिता कलम १२० बी अंतर्गत कारस्थान आणि ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात
आला होता. (पान २ वर)