गोव्यातील पर्यटनासाठी केंद्राकडून 200 कोटींचे प्रकल्प मंजूर
By Admin | Updated: August 8, 2016 16:57 IST2016-08-08T16:57:29+5:302016-08-08T16:57:29+5:30
अंतर्गत पर्यटनासाठी केंद्राडून 550 कोटी मिळविणयासाठी प्रकल्पांची यादी दिली आल्याची माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी दिली.

गोव्यातील पर्यटनासाठी केंद्राकडून 200 कोटींचे प्रकल्प मंजूर
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 08 - अंतर्गत पर्यटनासाठी केंद्राडून 550 कोटी मिळविणयासाठी प्रकल्पांची यादी दिली आल्याची माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी दिली.
500 कोटीं पैकी 200 कोटी रुपयांच्या मंजुरी मिळाली आहे. तसेच 20 कोटी रुपये आतापर्यंत राज्याला मिळाले आहेत अशी माहिती पर्यटन मंत्र्यांनी दिली.
नवीन प्रकल्पांसाठी राज्य सरकारने केंद्राकडून निधी मिळावा यासाठी काय प्रयत्न केले आहेत असा प्रश्न आमदार निलेश काब्राल यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना पर्यटन मंत्र्यांनी ही माहिती दिली.
2009 ते 2012 या काळात केंद्राने विविध पर्यटन प्रकल्पासाठी दिलेला निधी तत्कालीन कॉंग्रेस सरकारकडून इतरत्र वळविला ही गोष्ट पर्यटनमंत्र्यांनी पुन्हा एकदा सभागृहाच्या नजरेस आणून दिली. दोन दिवसांपूर्वी ही गोष्ट त्यांनी सभागृहात सांगितली होती. त्यावर उपप्रश्न विचारताना आमदार प्रमोद सावंत यांनी निधी इतरत्र वळविणाऱ्यांवर कारवाई का केली नाही असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी हाच प्रश्न सभागृहात विचारला होता.