सीडीएम स्मीथचे गोवा कनेक्शन स्कॅनरवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 21:33 IST2018-02-10T21:33:31+5:302018-02-10T21:33:44+5:30
अमेरिकेतील सीडीएम स्मिथ कंपनीकडून भारतातील शासकीय अधिका-यांना दिलेल्या कथित लाच प्रकरणात सीबीआयकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सीडीएम स्मीथचे गोवा कनेक्शन स्कॅनरवर
पणजी - अमेरिकेतील सीडीएम स्मिथ कंपनीकडून भारतातील शासकीय अधिका-यांना दिलेल्या कथित लाच प्रकरणात सीबीआयकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कंपनीनो गोव्यातही सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिका-यांनाही लाच चारल्याची कबुली दिल्यामुळे त्या अनुशंगानेही तपास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सीडीएम स्मिथ या अमेरिकन कंपनीने १६.७ लाख रुपये लाच दिल्याची कबुली दिली आहे. हे प्रकरणही पाणी पुरवठ्यासंबंधीच असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. लुईस बर्जर लाचखोरी काँग्रेस सरकारच्या काळात घडली होती, तर ह्यसीडीएम स्मिथची लाचखोरी २०११ ते २०१५ या काळात झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. गोव्यात पाणी प्रकल्पासाठी कंत्राट घेण्यासाठी प्राधिकरणाच्या अधिका-यांना लाच द्यावी लागली होती. गोव्यातील प्रकल्पाचे कंत्राट मिळविण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या एकापेक्षा अधिक अधिका-यांना २५ हजार अमेरिकन डॉलर लाच देण्यात आल्याचे कंपनीच्या अमेरिकन न्यायालयातील निवेदनातून स्पष्ट होत आहे. भारतीय चलनात त्याची किंमत १६.१ लाख रुपये आहे. त्यात लाचेची रक्कम ह्यकंत्राटाच्या रकमेच्या २ टक्क्यांपासून ४ टक्के असे म्हटले आहे.
सीबीआयने या प्रकरणात कंपनीच्या सीईओविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्यामुळे या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. त्यामुळे गोव्यातील त्या अधिकाºयांची चौकशीही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.