काजू महोत्सव थाटात सुरू; काजू मंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 09:01 IST2026-04-11T09:00:53+5:302026-04-11T09:01:52+5:30

कांपाल येथील बांदोडकर मैदानावर गोवा वन विकास महामंडळ अंतर्गत तीन दिवसीय 'गोवा काजू महोत्सव २०२६' चे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले.

cashew festival 2026 begins in goa cm pramod sawant announces establishment of cashew board | काजू महोत्सव थाटात सुरू; काजू मंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

काजू महोत्सव थाटात सुरू; काजू मंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोमंतकीय काजू ब्रेडचे जतन करण्यासाठी लवकरच काजू मंडळ स्थापन केले जाईल. हे मंडळ कृषी खाते आणि वन विकास महामंडळाच्या समन्वयाने काम करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. आफ्रिकन आणि परराज्यातील काजू गोवा काजू ब्रँडखाली विकणाऱ्यांवर कडक कारवाई गेली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

कांपाल येथील बांदोडकर मैदानावर शुक्रवारी गोवा वन विकास महामंडळ अंतर्गत तीन दिवसीय 'गोवा काजू महोत्सव २०२६' चे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिराडेकर, गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष, आमदार डॉ. दिव्या राणे, खासदार सदानंद तनावडे, आमदार नीलेश काब्राल, उल्हास तुयेकर, दाजी साळकर, केदार नाईक, डिलायला लोबो, जि. पं. अध्यक्षा रेश्मा बांदोडकर, प्रधान वनसंरक्षक कमल दत्ता, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक के. रमेश कुमार, सरव्यवस्थापक अमर हेबळेकर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, 'राज्यात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. याचा आणखी विस्तार व्हावा यासाठी हे मंडळ उभारले जाणार आहे. गोमंतकीय काजू क्षेत्र राज्यातील सुमारे ३० हजार कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. गोव्याचा काजू पूर्णपणे सेंद्रिय असून त्याची गुणवत्ता आणि मागणी देश-विदेशात वाढत आहे.

आमदार डॉ. दिव्या राणे यांनी वन विकास महामंडळाच्या आधारे 'सिल्वन' ब्रँड अंतर्गत या काजूला जागतिक ओळख दिली आहे. या उपक्रमामुळे काजू उत्पादकांना योग्य मार्गदर्शन, बाजारपेठ उपलब्धता आणि आर्थिक सहाय मिळणार असून, राज्यातील काजू उद्योग अधिक सक्षम होईल' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

... . तर कारवाई होणार

मुख्यमंत्री म्हणाले की, 'राज्यात काही दुकानांवर आफ्रिकन तसेच परराज्यातील काजू गोवन काजू म्हणून विकले जातात. त्यामुळे यातून पर्यटकांची फसवणूक केली जाते. यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनकडून मोहीम राबिवली जाणार आहे. विक्रेत्यांनी बाहेरील काजू स्थानिक बँड म्हणून विकू नये. स्थानिक काजू विक्रीवर जास्त भर द्यावा.'

खाद्याची मेजवानी

या महोत्सवात खाद्यप्रेमींसाठी काजूपासून बनवलेल्या विविध अनोख्या पदार्थांची मेजवानी भरली आहे. याशिवाय, 'काजू मिट्स क्रिएटिव्हिटी' या स्पर्धेद्वारे काजूपासून बनवलेल्या रेसिपीची दालने या महोत्सवात मांडली आहेत. महिला मंडळाची विविध खाद्याची दालने येथे मांडण्यात आली आहेत. कृषी कार्यशाळांद्वारे काजू लागवडीस चालना देणे आणि शाश्वत शेती पद्धर्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही भर दिला जाणार आहे.

काजू फेस्तमुळे काजू व फेणीला जागतिक ओळख : डॉ. दिव्या राणे

आमदार दिव्या राणे म्हणाल्या, '२०२३ मध्ये सुरू करण्यात महोत्सवामुळे राज्यातील काजू आणि फेणी उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे. महोत्सवामुळे काजू उत्पादक, फेणी निर्माते आणि प्रक्रिया करणाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. जीआय मानांकन आणि सरकारच्या पाठबळामुळे राज्यातील काजू जागतिक दर्जावर पोहचला. भेसळ रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कडक कारवाईमुळे काजूची गुणवत्ता अधिक सुधारली आहे. गोवा काजू फेस्ट हा केवळ उद्योगवाढीपुरता मर्यादित नसून, तो राज्याच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि स्थानिक समुदायाचा उत्सव साजरा करणारा महत्त्वाचा उपक्रम आहे.'

मनोरंजनाचाही आस्वाद

काजू महोत्सव, उद्या रविवार दि. १२ पर्यंत चालणार आहे. या महोत्सवात प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून संगीतप्रेमींसाठी विशेष आकर्षण म्हणून नामांकित गायक-कलाकारांचे थेट सादरीकरण आहे. काल उद्घाटनाच्या दिवशी जॉनिता गांधी यांनी आपल्या गायनातून उपस्थितांना उर्जा वाढविली. तसेच 'मर्दानी' या महिलांच्या संरक्षणाचा पथनाट्य सादर करण्यात आले. आज, शनिवारी बेनी डायल यांचा संगीताचा कार्यक्रम होणार आहे. तर उद्या, रविवारी सचिन व जीगर यांचे लाईव्ह परफॉर्मन्स आयोजित करण्यात आले आहेत.
 

Web Title : गोवा काजू महोत्सव शुरू; मुख्यमंत्री ने काजू बोर्ड की स्थापना की घोषणा की।

Web Summary : गोवा काजू महोत्सव 2026 का उद्घाटन हुआ। मुख्यमंत्री सावंत ने गोवा के काजू की रक्षा के लिए काजू बोर्ड की घोषणा की। गैर-गोवा काजू को स्थानीय बताकर बेचने पर कार्रवाई होगी। महोत्सव में काजू उत्पाद, खेती और गोवानी संस्कृति को बढ़ावा दिया जा रहा है।

Web Title : Goa Cashew Festival begins; CM announces Cashew Board establishment.

Web Summary : Goa's Cashew Festival 2026 inaugurated with CM Sawant announcing a Cashew Board to protect Goan cashew. Action against selling non-Goan cashews as local. The festival promotes cashew products, farming, and Goan culture with music and food.