नुवे दरोडा प्रकरणी सडा तुरुंग अधिकारी अडचणीत

By Admin | Updated: February 10, 2015 01:45 IST2015-02-10T01:44:09+5:302015-02-10T01:45:27+5:30

पणजी : नुवे येथील घरात घातलेल्या दरोड्याचे नियोजन ज्या मोबाईलचा वापर करून सडा तुरुंगात करण्यात आले होते,

In the case of Nayu Niroda, the trouble of the riot officer in the case | नुवे दरोडा प्रकरणी सडा तुरुंग अधिकारी अडचणीत

नुवे दरोडा प्रकरणी सडा तुरुंग अधिकारी अडचणीत

पणजी : नुवे येथील घरात घातलेल्या दरोड्याचे नियोजन ज्या मोबाईलचा वापर करून सडा तुरुंगात करण्यात आले होते, तो मोबाईल पोलिसांना मिळण्यापासून तुरुंग अधिकाऱ्याने पोलिसांना वंचित करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून गुन्ह्याचे कारस्थान रचण्यापासून पुरावे नष्ट करण्यापर्यंतच्या गुन्ह्यात तुरुंग अधिकारी अडकण्याची शक्यता आहे.
नुवे येथील दरोडा प्रकरणातील तपास वेगळ््या वळणावर येऊन पोहोचला आहे. या दरोड्याचे नियोजन सडा तुरुंगात करण्यात आले, हे चार दिवसांपूर्वीच उघड झाले होते. त्यासाठी विशेष मोबाईलचा उपयोग करण्यात आला होता, अशी कबुली तुरुंगात कैदी म्हणून असलेला अनिल भोई याने दिल्यानंतर या कारस्थानाचा दुसरा भाग उघडकीस येऊ लागला आहे.
पोलिसांनी दडपण आणल्यानंतर भोईने तोंड उघडले आणि सर्व माहिती पोलिसांना दिली. तुरुंगातच आपण मोबाईल वापरत होतो. नुवेचा दरोडाही मोबाईलवरच ठरला होता, असे त्याने पोलिसांना सांगितले. मोबाईल तुरुंगात आपण १४ क्रमांक सेलमध्ये ठेवला असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले होते. (पान २ वर)

Web Title: In the case of Nayu Niroda, the trouble of the riot officer in the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.