कारवारच्या ट्रॉलरची गोव्यात घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 21:39 IST2019-09-25T21:37:12+5:302019-09-25T21:39:11+5:30

काही वेळ तणाव : मच्छिमारीमंत्र्यांचे घुसखोरांवर कडक कारवाईचे आदेश 

carwar trawler infiltrates Goa sea | कारवारच्या ट्रॉलरची गोव्यात घुसखोरी

कारवारच्या ट्रॉलरची गोव्यात घुसखोरी

पणजी : गोव्याच्या सागरी हद्दीत अतिक्रमण करणाºया परप्रांतीय ट्रॉलर्सवर कारवाई करण्यास मच्छिमारी खाते टाळाटाळ करीत असल्याने बागा येथील संतप्त मच्छिमारांनी शेवटी स्वत:च कायदा हातात घेत मालपें, कारवार येथील बेकायदा घुसखोरी केलेल्या हायस्पीड ट्रॉलर पकडला. यामुळे काहीवेळ तेथे तणाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर मच्छिमारीमंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स यांनी दुपारी तातडीची बैठक घेऊन अतिक्रमण करणाºया परप्रांतीय ट्रॉलर्सवर कारवाईचे आदेश दिले. 

७५0 अश्वशक्ती इंजिनाचा हा हायस्पीड ट्रॉलर्स गोव्याच्या सागरी हद्दीत बागा, कळंगुटनजीक किनाºयापासून अवघ्या १२.५ मिटर अंतरावर खुले आम मच्छिमारी करीत होता. परप्रांतीय ट्रॉलर्स घुसखोरी करुन येथे मच्छिमारी करीत असल्याच्या अनेक तक्रारी खात्याकडे देऊनही कोणतीच कारवाई झाली नव्हती. बुधवारी बागा येथे हा ट्रॉलर पकडल्यानंतर स्थानिक आमदार तथा बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो, सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस लोबो, महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी मच्छिमारी खात्याचे मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स यांना बैठक घेण्यास भाग पाडले. 

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री रॉड्रिग्स म्हणाले की, ‘ घुसखोरीचे असले प्रकार मुळीच खपवून घेतले जाणार नाहीत.’ मंत्री मायकल लोबो म्हणाले की, ‘ कर्नाटक व गुजरातचे ट्रॉलर्स मोठ्या प्रमाणात घुसखोरी करतात. किनाºयापासून १ किलोमिटर अंतरातसुध्दा त्यांची मच्छिमारी चालू असते. त्यांचे खलाशी तलवारी तसेच अन्य शस्रांनी सज्ज असतात त्यामुळे सागरी पोलिसांनीही यापुढे कारवाईसाठी जाताना शस्रसज्ज जावे असे निर्देश दिलेले आहेत. 

मंत्री जेनिफर मोन्सेरात तसेच आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनीही आपल्या मतदारसंघात परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी ही मोठी समस्या बनल्याचे सांगितले. 

Web Title: carwar trawler infiltrates Goa sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.