शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बँण्ड शो वरून परतणाऱ्या कारचा अपघात, एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 16:57 IST

नाताळ व नववर्षानिमित्त सध्या गोव्यात संगीत रजनीचे कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरे केले जात आहेत. राज्यातील उत्तर गोवा जिल्हयातील आर्पोरा येथे बँण्ड शोचा कार्यक्रम आटपून घरी परत जात असताना कारने एका झाडाला धडक दिल्याने कारचालकचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देनाताळ व नववर्षानिमित्त सध्या गोव्यात संगीत रजनीचे कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरे केले जात आहेत.आर्पोरा येथे बँण्ड शोचा कार्यक्रम आटपून घरी परत जात असताना कारने एका झाडाला धडक दिल्याने कारचालकचा मृत्यू झाला.दक्षिण गोव्यातील मडगाव येथील घोगळ या उपनगरीय भागात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अपघाताची घटना घडली.

मडगाव - नाताळ व नववर्षानिमित्त सध्या गोव्यात संगीत रजनीचे कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरे केले जात आहेत. राज्यातील उत्तर गोवा जिल्हयातील आर्पोरा येथे बँण्ड शोचा कार्यक्रम आटपून घरी परत जात असताना कारने एका झाडाला धडक दिल्याने कारचालकचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य तीन जण जखमी झाले आहेत. दक्षिण गोव्यातील मडगाव येथील घोगळ या उपनगरीय भागात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अपघाताची घटना घडली. ब्रायज फर्नाडीस (21) असे मृत चालकाचे नाव असून तो कोलवा येथील रहिवाशी आहे. जोश्वा वाझ (18) रा. रावणफोंड, क्लिटंन मार्टीन्स (25) रा. वार्का व न्युसेन पेरेरा (20) रा. कोलवा अशी जखमींची नावे आहेत. 

जखमींपैकी जोश्वा वाझ व क्लिटंन मार्टीन्स यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या रुग्णालयात तर न्युसेन पेरेरा याच्यावर मडगावच्या हॉस्पिसियो रुग्णालयात उपचार चालू आहे. जखमीपैंकी दोन जण म्युझिशियन असल्याची माहितीही फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक फ्रान्सिस ङोवियर यांनी दिली. रात्री आर्पोरा येथे बँण्ड शो होता. हा शो आटपून कारमधून चार जण मडगावला आले होते. जोश्वा हा रावणफोंड येथे रहात असल्याने त्याला घरी पोहचविण्यासाठी पुर्वबगल मार्ग रस्त्यातून जात असताना कारने एका झाडाला धडक दिली. अपघात घडला तेव्हा तेथून एक इसम जात होता. त्याने त्वरीत फातोर्डा पोलिसांना अपघातविषयी माहिती दिली. 

फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फ्रान्सिस ङोवियर यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना सुरुवातीला मडगावच्या हॉस्पिसियो रुग्णालयात दाखल केले. तेथे ब्रायज फर्नाडीस याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. जोश्वा व क्लिंटनची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या रुग्णालयात  नेण्यात आले. भारतीय दंड संहितेच्या 279, 338 व 304 (अ) कलमाखाली पोलिसांनी वरील अपघात प्रकरणांची नोंद केली आहे. मृत चालक ब्रायज फर्नांडीस याच्यावर या अपघातप्रकरणी गुन्हा नोंदविला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 

टॅग्स :AccidentअपघातgoaगोवाDeathमृत्यू