सीएएचा परिणाम जिल्हा पंचायत निवडणुकीवर नाही- सदानंद तानावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 07:45 PM2020-01-27T19:45:52+5:302020-01-27T19:46:01+5:30

सीएए कायद्यामुळे गोव्यात भाजपा विरोधी लोकमत तयार झाले आहे, असे जे चित्र रंगवले आहे.

The CAA does not affect the district panchayat elections | सीएएचा परिणाम जिल्हा पंचायत निवडणुकीवर नाही- सदानंद तानावडे

सीएएचा परिणाम जिल्हा पंचायत निवडणुकीवर नाही- सदानंद तानावडे

Next

मडगाव: सीएए कायद्यामुळे गोव्यात भाजपा विरोधी लोकमत तयार झाले आहे, असे जे चित्र रंगवले आहे ते खरे नसून गोव्यातील जनतेने या कायद्याला समर्थनच दिले आहे, असे मत भाजपाचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त करतानाच जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीवर या मुद्द्याचा काहीच परिणाम होणार नाही, असे मत व्यक्त केले.

सोमवारी मडगावात भाजपाची दक्षिण गोवा कार्यकारिणी जाहीर करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. ते म्हणाले, या कायद्याच्या समर्थनासाठी भाजपाने रॅली आयोजित केली होती. त्या रॅलीला आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला होता. यावरुन गोव्याच्या जनतेचा कल कुणीकडे आहे हे स्पष्ट होते. जिल्हा पंचायत निवडणुकात दोन्हीकडे भाजपाचीच सत्ता येणार याची खात्री आम्हाला आहे, असे ते म्हणाले. सीएए कायदा संसदेत संमत झाला आहे. संसदेत संमत झालेला कायदा बदलता येत नाही याची पूर्ण जाणीव असतानाही सीएए विरोधी सभेला गोवा विधानसभेचे पाच आमदार उपस्थित रहातात ही दूर्दैवी बाब आहे. इतरांना कायद्याचे ज्ञान नाही, असे म्हणता येईल. मात्र आमदारानाही कायद्याचे ज्ञान नाही का असा सवाल त्यांनी केला.

यावेळी तुळशीदास नाईक यांच्या अध्यक्षतेखालील ४६ सभासदांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात उपाध्यक्ष म्हणून दीपक नाईक बोरकर, संतोष केरकर, लियो रॉड्रीगीस, महेश नाईक, सरचिटणीस म्हणून सुरेश केपेकर, विशाल शाबू देसाई, सत्यविजय नाईक, सचिवपदी समीरा कार्दोज, गणपत नाईक, गणेश वेळीप, गौरी शिरोडकर, रजनी नाईक तर खजिनदारपदी राजीव सुखठणकर यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी आमदार दामू नाईक,माजी खासदार नरेंद्र सावईकर, अल्पसंख्याक विभागाचे शेख जीना हे उपस्थित होते.

या कार्यकारिणीचे सदस्य खालील प्रमाणे- दिगंबर जल्मी, रजनी गावकर, सुभाष नाईक, नागेश चितारी, हेजल फर्नाडीस, भूषण प्रभूगावकर, खूषाली परवार,विनय तारी, जेम्स परैरा, विश्वनाथ दळवी, तुळशीदास नाईक, राजेंद्र बिचोलकर, योगेश खांडेपारकर, अरुण फळदेसाई, सुबोध गोवेकर, रंजीता पै, दामोदर नाईक, अशोक नाईक, अनिता गावडे, दुर्गादास प्रभू, गोडफ्रे कुरैय, लविना रॉड्रीगीस, जॉर्जीना गामा, रमाकांत गावकर, नॉयला रॉड्रीगीस, दिक्षा तांबोसकर, सावियो पायस, मिंगेलीना वेलो, पिरीस डिकॉस्ता, संदीप फळदेसाई, गणेश लमाणी व शैलेश तिवारी.
 

Web Title: The CAA does not affect the district panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.