गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २ फेब्रुवारीपासून

By किशोर कुबल | Updated: January 1, 2024 20:20 IST2024-01-01T20:20:17+5:302024-01-01T20:20:46+5:30

राज्यपाल पी. एस. श्रीधरन् पिल्लई यांनी यासंबंधीचा आदेश काढला आहे.

Budget Session of Goa Legislative Assembly from 2 February | गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २ फेब्रुवारीपासून

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २ फेब्रुवारीपासून

किशोर कुबल/पणजी
पणजी : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता बोलावण्यात आले असून ९ तारीखपर्यंत ते चालणार आहे. प्रत्यक्ष कामकाज सहा दिवसांचे असणार आहे.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन् पिल्लई यांनी यासंबंधीचा आदेश काढला आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला जाणार असून आर्थिक सर्वेक्षण अहवालही सादर केला जाईल. नवीन वर्षाचे पहिले अधिवेशन असल्याने पहिल्याच दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल.

Web Title: Budget Session of Goa Legislative Assembly from 2 February