बोंडवोल तलावाचे पाणी सोडल्याने खळबळ, रुडॉल्फ फर्नांडिस संतप्त

By किशोर कुबल | Updated: November 27, 2023 15:57 IST2023-11-27T15:56:49+5:302023-11-27T15:57:13+5:30

आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांचा खात्याविरुध्द  तक्रार नोंदवण्याचा इशारा

Bondvol lake water release stirs, Rudolph Fernandes angry | बोंडवोल तलावाचे पाणी सोडल्याने खळबळ, रुडॉल्फ फर्नांडिस संतप्त

बोंडवोल तलावाचे पाणी सोडल्याने खळबळ, रुडॉल्फ फर्नांडिस संतप्त

किशोर कुबल/पणजी: सांताक्रुज येथील बोंडवोल तलावाचे पाणी कोणीतरी अज्ञाताने सोडल्याने खळबळ माजली असून स्थानिक आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी जलस्रोत खात्याविरुद्ध तक्रार नोंदवण्याचा इशारा दिला आहे.

रुडॉल्फ म्हणाले की, वॉल्व उघडून कोणीतरी पाणी सोडण्याचा हा संतापजनक प्रकार केलेला आहे मी माझ्या मतदारसंघात शेतकऱ्यांना पाणी मिळावे त्यासाठी ओहोळ दुरुस्त करून घेतले‌. या तलावावर सर्वजण अवलंबून होते. पाणी सोडण्याचे हे गैरकृत्य ज्याने केले असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. त्या अनुषंगाने मी शिष्टमंडळासह जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असून पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे नोंदवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणार आहे.'

दुसरीकडे आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी तलावाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. ते म्हणाले की जलस्रोत खात्याने आज सोमवारी सायंकाळपर्यंत तातडीने या तलावाची पाहणी करून आवश्यक ती पावले उचलल्यास मी पोलीस तक्रार करणार आहे. तलावाचे पाणी सोडण्याचा प्रकार संतापजनक आहे. तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पालेकर हे गेल्या विधानसभा निवडणुकीत सांताक्रुज मतदान संघातून रिंगणात होते. त्यांनी वेळोवेळी सांताक्रुजचे विषय हाती घेतले आहेत.

Web Title: Bondvol lake water release stirs, Rudolph Fernandes angry

टॅग्स :goaगोवा