शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

लोकसभेच्या पूर्वतयारीचा भाजपामध्ये जागर, पक्ष यंत्रणा सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 7:50 PM

आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून गोवा प्रदेश भाजपामध्ये पूर्वतयारीचा जागर सुरू झाला आहे. पक्ष यंत्रणा सक्रिय केली जाऊ लागली असून, येत्या शनिवारपासून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे विधानसभा मतदारसंघनिहाय दौरे सुरू करणार आहेत.

पणजी : आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून गोवा प्रदेश भाजपामध्ये पूर्वतयारीचा जागर सुरू झाला आहे. पक्ष यंत्रणा सक्रिय केली जाऊ लागली असून, येत्या शनिवारपासून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे विधानसभा मतदारसंघनिहाय दौरे सुरू करणार आहेत.भाजपाच्या राज्यस्तरीय पदाधिका-यांनी दौ-याची पूर्वतयारी म्हणून गुरुवारी काणकोणला भेट दिली व तयारीचा आढावा घेतला.सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी काणकोणमध्ये जाऊन दौ-याचे सगळे नियोजन केले आहे. 13 रोजी सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू होईल. गुळे-करमलघाट येथे मुख्यमंत्र्यांचे भाजपाच्या युवा मोर्चाकडून स्वागत केले जाणार आहे. पावणे दहा वाजता आगोंद कम्युनिटी हॉलमध्ये मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. नंतर श्रीस्थळ येथील मल्लिकार्जुन देवस्थानला भेट देणे तसेच दुपारी 12 वाजता खोतीगाव पंचायत सभागृहात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील, असे पक्षाने जाहीर केले आहे.दुपारीही विविध पंचायत क्षेत्रांमध्ये मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम होतील. पैंगीण, लोलये आदी भागांना मुख्यमंत्री भेट देतील. काणकोण पालिका सभागृहातही एक बैठक होईल. सायंकाळी सहा वाजता चावडी येथे भाजपाच्या कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल.काणकोणनंतर मग अन्य विधानसभा मतदारसंघांच्या दौ-यांचे भाजपाकडून नियोजन केले जाणार आहे. मे महिन्यापर्यंत सर्व चाळीसही मतदारसंघांत दौरा पूर्ण करायचा, असे भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने ठरवले आहे. फेब्रुवारी व मार्चमध्ये विधानसभा अधिवेशन होणार आहे. तरीही मे महिन्यापर्यंत 30 ते 35 मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री दौरे पूर्ण करतील, असे भाजपाच्या पदाधिका-यांना वाटते.भाजपाला पुन्हा दोन्ही लोकसभा मतदारसंघ जिंकायचे असल्याने आतापासून पक्ष फिल्डिंग लावू लागला आहे. त्यासाठी गोवा फॉरवर्ड, मगोप आणि अपक्ष मंत्र्यांनाही लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी कुठेच दुखवायचे नाही असे धोरण पक्षाने स्वीकारले असल्याची माहिती मिळते.मंत्र्यांच्या भेटी सुरूदरम्यान, भाजपाच्या मंत्र्यांनी पक्ष कार्यालयात बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्याचा कार्यक्रम नव्याने सुरू करण्यात आला आहे. मध्यंतरी नाताळाच्या सुट्टीनिमित्त हा कार्यक्रम बंद होता. गुरुवारी प्रथमच पंचायत मंत्री माविन गुदिन्हो हे भाजपाच्या येथील कार्यालयात उपस्थित राहिले. डिचोली, मये व अन्य काही मतदारसंघातील ग्रामपंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मंत्री गुदिन्हो यांची भेट घेतली. पंचायत क्षेत्रातील विकासकामांविषयीच्या अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. गुदिन्हो यांच्याकडे पशुसंवर्धन खातेही असल्याने त्याविषयीही काही कार्यकर्त्यांच्या अपेक्षा गुदिन्हो यांनी जाणून घेतल्या. यापूर्वी वीज मंत्री पांडुरंग मडकईकर, आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक आदी भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटले होते. मुख्यमंत्री पर्रीकर हेही एक दिवस कार्यालयात उपस्थित राहिले होते.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा