भाजपची गोव्यात १७ यू-टर्नस

By Admin | Updated: February 11, 2015 02:11 IST2015-02-11T02:04:23+5:302015-02-11T02:11:35+5:30

पणजी : भाजपने गोव्यात सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत एकूण १७ यू-टर्न घेतली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे

BJP's 17 U-Turns in Goa | भाजपची गोव्यात १७ यू-टर्नस

भाजपची गोव्यात १७ यू-टर्नस

पणजी : भाजपने गोव्यात सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत एकूण १७ यू-टर्न घेतली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यात १२ मोठ्या यू-टर्नसचा आणि ५ छोट्या यू-टर्नसचा समावेश आहे.
भाजपने अडीच वर्षांच्या कालावधीत गोव्यात केवळ प्रत्येक मुद्द्यावर भूमिका बदलण्याचे काम केले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी केला आहे. खोटी आश्वासने देऊन लोकांना फसवून सत्ता मिळविली आणि सत्ता मिळाल्यानंतर आश्वासने गुंडाळली, असे त्यांनी सांगितले. पणजी पोटनिवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील, असा आरोप त्यांनी केला.

Web Title: BJP's 17 U-Turns in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.