भाजप व्होट बँक अबाधित
By Admin | Updated: February 17, 2015 02:26 IST2015-02-17T02:20:36+5:302015-02-17T02:26:31+5:30
पणजी : भारतीय जनता पक्षाची पणजी मतदारसंघातील व्होट बँक अबाधित राहिली आहे, हीच गोष्ट सोमवारी झालेल्या

भाजप व्होट बँक अबाधित
पणजी : भारतीय जनता पक्षाची पणजी मतदारसंघातील व्होट बँक अबाधित राहिली आहे, हीच गोष्ट सोमवारी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाली. मतदारसंघातील तीसपैकी केवळ तीनच केंद्रांवर काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांना थोडी आघाडी मिळाली. उर्वरित सर्व केंद्रांवर भाजपचे विजयी उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनाच आघाडी मिळाली आहे.
२०१२ साली काँग्रेसतर्फे यतिन पारेख यांनी पणजीतून निवडणूक लढवली होती, तेव्हा काँग्रेसला ४ हजार ९९५ मते मिळाली होती. त्या वेळी सतरा हजार एवढे मतदान झाले होते. या वेळी १५ हजार ७७४ मतदान झाले. काँग्रेसला त्यापैकी ४ हजार ४२१ मते मिळाली. म्हणजे तीन वर्षांनंतरही काँग्रेसची मते वाढली नाहीत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसला पणजीत साडेचार हजार मते प्राप्त झाली होती. रवी नाईक यांनी त्या वेळी पणजीत जास्त प्रचार न करता साडेचार हजार मते प्राप्त केली होती. भाजपला २०१२ मध्ये ११ हजार मते मिळाली होती. भाजपला आता ९ हजार ९८९ मते मिळाली. म्हणजे दहा हजारांपर्यंत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी मजल मारली. अपक्ष समीर केळेकर व सदानंद वायंगणकर या दोघांना मिळून जी आठशे मते मिळाली आहेत व नोटा पर्याय ज्या ३३० मतदारांनी स्वीकारला आहे, त्यात भाजप समर्थकांचीही मते आहेत. पणजी मतदारसंघातील हिंदू बहुजन समाज हा ठामपणे कुंकळ्येकर यांच्याच बाजूने राहिला हे बोक द व्हाक, सांतइनेज, मळा, रायबंदर येथे भाजपने मिळविलेल्या प्रचंड मतांवरून स्पष्ट होते. महिलावर्गानेही भाजपलाच जास्त मते दिली.
कुंकळ्येकर यांना तिकीट दिले गेले तरी, पणजीतील भाजपची व्होट बँक फुटली नाही. भाजपची हक्काची मते पक्षाला मिळालीच. ख्रिस्ती समाजाचीही मते (पान २ वर)