शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

मगोपशी युतीबाबत भाजप सकारात्मक: भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 08:12 IST

'लोकमत' कार्यालयास सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मगोपशी युतीबाबत भाजप सकारात्मक आहे, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले आहे. 'लोकमत' कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी वार्तालापात ते बोलत होते.

नाईक म्हणाले की, 'मगो हा भाजपसाठी समविचारी पक्ष आहे. त्यामुळे युतीबाबत आमचा पक्ष सकारात्मक आहे. याबाबत योग्य वेळ येताच योग्य तो निर्णय जाहीर करू. एका प्रश्नावर नाईक म्हणाले की, 'भाजपपासून काही ना काही कारणांमुळे दुरावलेले जुने नेते, कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणले जाईल. ५९३ जणांची यादी आम्ही तयार केलेली आहे. दुरावलेले अनेकजण पक्षात परतू लागले आहेत. येणाऱ्या काळात आणखी काहीजण स्वगृही परततील.'

दामू म्हणाले की, 'विरोधकांबाबत गोव्याचे लोक शिक्षित जाणून आहेत. दरोडेखोरांच्या हातात लोक सत्ता देणार नाही. २०२७ मध्ये भाजपचेच सरकार येणार हे निश्चित आहे.' प्रदेशाध्यक्ष नाईक म्हणाले की, 'मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल दरमहा रिपोर्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांना पाठवला जातो.

शिवाय, पक्षाच्या केंद्रीय नेत्यांचीही वेगळी यंत्रणा असून तेदेखील गोव्यातील माहिती घेत असतात व तो अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांना देत असतात. सरकारच्या कामगिरीवर पक्ष म्हणून आमची नजर कायम असते.' भाजपला फरक पडणार नाही

एका प्रश्नावर नाईक म्हणाले की, '२०२७ च्या निवडणुकीत विरोधक एकी करुन लढले तरी भाजपला कोणताही फरक पडणार नाही. डाव, प्रतिडाव अखेरच्या क्षणी ठरत असते. त्यावेळीची स्थिती व मागणी लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेऊ. मगोपशी युतीबाबत आमचे उत्तर 'हो' असेच आहे.

'माझे घर'चा मोठा दिलासा

'माझे घर' योजनेचे दामू यांनी जोरदार स्वागत केले. ते म्हणाले की, 'ही योजना आणण्यामागे सरकारचा अत्यंत चांगला हेतू असून लोकांना दिलासा मिळेल. ते म्हणाले की, 'पंतप्रधान घरकूल योजना करुन लोकांना घरे दिली जातात ती जमीन सरकारचीच असते. गृहनिर्माण मंडळ भूखंड करुन विकतो ती जमीनही सरकारची. मग सरकारी, कामुदनिदाद जमिनींमधिल घरे अधिकृत करण्यास काय हरकत आहे?

English
हिंदी सारांश
Web Title : BJP positive on alliance with MGP: BJP State President Damu Naik

Web Summary : BJP is open to allying with MGP for the 2027 elections, says state president Damu Naik. The party aims to bring back former leaders and workers. Despite opposition unity efforts, BJP is confident of winning. Naik supports the 'My Home' scheme, providing relief to people.
टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणLokmatलोकमत