शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांनी शहांकडे जाताना डावलल्याने भाजपाचे मंत्री नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 12:15 IST

गोव्याचा खनिज खाण प्रश्न घेऊन दिल्लीला जाताना सर्व चारही भाजपा मंत्र्यांना सोबत नेले जाईल, असे भाजपाच्या बैठकीत यापूर्वी ठरले होते.

पणजी : गोव्याचा खनिज खाण प्रश्न घेऊन दिल्लीला जाताना सर्व चारही भाजपा मंत्र्यांना सोबत नेले जाईल, असे भाजपाच्या बैठकीत यापूर्वी ठरले होते. तरी देखील भाजपाच्या खासदारांनी प्रत्यक्ष दिल्ली भेटीवेळी काही मंत्र्यांना डावलल्याने व गुपपूच दिल्लीला जाण्याचा प्रकार केल्याने भाजपाचे एक-दोन मंत्री खूप नाराज झालेले आहेत. एका मंत्र्याने तर यापुढे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत हा कथित बेशिस्तीचा विषय पोहचविण्याचे ठरविले आहे.

अलिकडेच भाजपाचे सगळे आमदार, मंत्री आणि भाजपाच्या कोअर टीमचे प्रमुख काही सदस्य यांची संयुक्त बैठक भाजपाच्या पणजीतील कार्यालयात झाली होती. गोव्याच्या खनिज खाणी जर लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरू झाल्या नाही तर दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा अडचणीत येईल असा इशारा बैठकीत मंत्री व काही आमदारांनीही दिला होता. त्यानंतर आम्ही दिल्लीला गोव्याचा खाणप्रश्न घेऊन जाऊया व प्रसंगी पंतप्रधान मोदींनाही भेटूया व त्यावेळी भाजपाचे चारही मंत्र्यांनी आमच्यासोबत यावे असे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बैठकीत जाहीर केले होते. मंत्री माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, निलेश काब्राल, मिलिंद नाईक, आमदार मायकल लोबो, ग्लेन तिकलो, प्रमोद सावंत आदी या बैठकीला उपस्थित होते.

पंतप्रधानांची भेट जर मिळाली नाही तर मग भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय खाण मंत्री नरेंद्रसिंग तोमर किंवा कायदा मंत्र्यांना भेटूया असेही बैठकीत काही आमदार बोलले होते. तथापि, भाजपाच्या खासदारांनी अचानक शहा यांची भेट निश्चित केली व केवळ तिघेच जाऊन शहा यांना भेटल्याने भाजपाचे एक मंत्री खूपच संतापले आहेत. आम्ही भाजपामध्ये नाही काय, आम्ही भाजपाचे सदस्य नव्हे का की आम्ही कुणी परकी आहोत असा प्रश्न एका मंत्र्याने विचारला आहे. तूर्त आपले नाव उघड करू नका पण आपण योग्यवेळी पत्रकार परिषद घेईन, असे या मंत्र्याने काही पत्रकारांनाही सांगितले. मंत्री निलेश काब्राल यांना एकटय़ालाच दिल्लीला बोलविले गेले होते पण तेही केवळ एक दिवस दिल्लीला राहून मग शहा यांना न भेटताच माघारी आले. तसेच केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक हेही शहा यांना भेटू शकले नाही. फक्त तेंडुकर, खासदार सावईकर व प्रमोद सावंत एवढेच शहा यांना व तोमर यांना भेटले. आपण यापुढे दिल्लीला जाईन तेव्हा शहा यांच्याकडे तक्रार करीन, जर भाजपाच्या बैठकीत ठरल्यानुसार कृती होत नसेल तर मग आम्ही बैठकांमध्ये सहभागी तरी का व्हावे असे एक मंत्री विचारत आहेत.

दरम्यान, उपसभापती मायकल लोबो हेही अस्वस्थ झालेले असून त्यांनी गोव्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका येतील व लोक सध्या राजकीय स्थितीवर खूप नाराज आहे असे सांगून भाजपाच्या दिशेने शाब्दिक बॉम्ब टाकला आहे. आमदार फ्रान्सिस डिसोझा व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी तर भाजपाच्या कोअर टीमच्या बैठकांना काही अर्थच राहिलेला नाही,असे म्हटले आहे.

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शाहgoaगोवा