भाजपा सरकारने लोकांचे हित जपले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 07:48 IST2025-10-14T07:47:15+5:302025-10-14T07:48:20+5:30
नास्नोडा पंचायतीत 'माझे घर योजने'अंतर्गत अर्ज वितरणाचा कार्यक्रम

भाजपा सरकारने लोकांचे हित जपले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : गोवा मुक्तीपासून सत्तेवर असलेल्या सरकारांकडून लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु भाजपा सरकार फक्त लोकांचे हित जपणारे, त्यांच्या कार्यासाठी झटणारे सरकार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
हळदोणा मतदारसंघातील नास्नोडा पंचायतीत माझे घर योजने अंतर्गत अर्ज वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी माझे घर योजनेची माहिती येथील नागरिकांना दिली. कार्यक्रमाला त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार अॅड. कार्ल्स फरेरा, माजी आमदार ग्लेन टिकलो, सरकारी सेवेतील अधिकारी, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच पंच सदस्य आदी उपस्थित होते. माझे घर योजनेमुळे राज्यातील नागरिकांमधून समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. तसेच उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
सुख शांती देणारी योजना : श्रीपाद नाईक
'माझे घर योजना' ही सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून प्रत्येकाच्या घरात या योजनेतून लोकांना सरकारने सुख शांती दिल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले. सत्तेवरील सरकारने या योजनेसोबत विविध हितकारी योजना अस्तीत्वात आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
केबल स्टेड पुलाच्या डागडुजीची मागणी
आमदार अॅड. कार्लस फरेरा, यांनी आपले विचार मांडताना केबल स्टेड पुलाची डागडुजी तसेच मार्केट प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली. ग्लेन टिकलो यांनी स्वागत केले तर उपजिल्हाधिकारी अंकीत यादव यांनी आभार प्रदर्शन केले.