शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

फोडाफोडीचे राजकारण पुरे, भाजपा कोअर टीमच्या बैठकीत सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 12:35 IST

भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचे राजकारण आणखी करू नये, कारण त्यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते दुखावले जातात, अशा प्रकारचा सल्ला भाजपाच्या कोअर टीमच्या बैठकीत काही सदस्यांनी दिला.

ठळक मुद्दे2017 सालची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर भाजपाने काँग्रेसमधून विश्वजित राणे यांना भाजपामध्ये प्रवेश दिला. वाळपईत व पर्ये मतदारसंघातही त्यामुळे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते हताश झाले. मगो पक्ष आपल्याविरोधात विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहे व त्यामुळे आपण मगोपला फोडले असे सांगितले जात असले तरी, पेडणे व सावर्डे मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांची त्यामुळे गोची झाली.

पणजी : भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचे राजकारण आणखी करू नये, कारण त्यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते दुखावले जातात, अशा प्रकारचा सल्ला भाजपाच्या कोअर टीमच्या बैठकीत काही सदस्यांनी दिला.

भाजपाच्या कोअर टीमच्या बैठकीचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, दयानंद मांद्रेकर, दामू नाईक, सतिश धोंड, संजीव देसाई, दत्ता खोलकर, सदानंद शेट तानावडे हे सदस्य आहेत. पूर्वी फ्रान्सिस डिसोझा व मनोहर पर्रीकर हे दोघे सदस्य असायचे. त्यांच्या निधनानंतर कोअर टीमवरील दोन पदे रिक्त झाली.

2017 सालची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर भाजपाने काँग्रेसमधून विश्वजित राणे यांना भाजपामध्ये प्रवेश दिला. वाळपईत व पर्ये मतदारसंघातही त्यामुळे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते हताश झाले. अलिकडेच भाजपाने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीनपैकी दोन आमदारांना त्या पक्षातून बाहेर काढले व भाजपामध्ये प्रवेश दिला. ही प्रक्रिया मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पार पडल्यामुळे जनतेतूनही चांगली प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. मगो पक्ष आपल्याविरोधात विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहे व त्यामुळे आपण मगोपला फोडले असे सांगितले जात असले तरी, पेडणे व सावर्डे मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांची त्यामुळे गोची झाली आहे. कोअर टीमच्या सोमवारच्या बैठकीत राजेंद्र आर्लेकर यांनी हा विषय उपस्थित केला. बाबू आजगावकर व दिपक प्रभू पाऊसकर या मगोप आमदारांना भाजपामध्ये प्रवेश देताना आम्हाला साधी कल्पनाही दिली गेली नाही, आम्ही कोअर टीमचे सदस्य आहोत, असे आर्लेकर बैठकीत म्हणाले. भाजपाने आणखी आमदार फोडण्याचे राजकारण करू नये, असे अन्य दोन सदस्यही बैठकीत बोलले.  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना हा सल्ला पटला की नाही ते कळू शकले नाही पण पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वानेच मगोपचे दोन आमदार भाजपामध्ये आणण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण तेंडुलकर यांनी बैठकीत दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. यापूर्वी दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांना काँग्रेसमधून भाजपामध्ये घेण्याच्या निर्णयामुळे तीन महिने पार्सेकर यांनी गोव्यातील स्थानिक भाजपा नेतृत्वाविरुद्ध कडक टीकेची झोड उठवली होती. सोमवारच्या बैठकीत तेही सहभागी झाले. फोडाफोडीविरुद्ध त्यांच्याही मनात असंतोष आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणcongressकाँग्रेस