गोव्यात भाजपा उमेदवाराकडून खून

By Admin | Updated: February 21, 2017 03:55 IST2017-02-21T03:55:05+5:302017-02-21T03:55:05+5:30

सालेली गावातील शाणू गावकर बेपत्ता युवकाच्या खुनाला तब्बल दहा वर्षांनी वाचा फुटली. भाजपाचे पर्ये विधानसभा

BJP candidate killed in Goa | गोव्यात भाजपा उमेदवाराकडून खून

गोव्यात भाजपा उमेदवाराकडून खून

पणजी : सालेली गावातील शाणू गावकर बेपत्ता युवकाच्या खुनाला तब्बल दहा वर्षांनी वाचा फुटली. भाजपाचे पर्ये विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विश्वजित कृष्णराव राणे यांनीच गावकर यांना गोळ््या घालून ठार केल्याचा गौप्यस्फोट पांडुरंग अर्थलकर नामक विश्वजित यांच्याच पूर्वीच्या वाहनचालकाने केला आहे.
घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचेही अर्थलकर याने म्हटले आहे. शाणू गावकर हा युवक २००६ मध्ये अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याला कोणीही पाहिले नाही. पोलिसांच्या अहवालातही बेपत्ता म्हणून त्याची नोंद झालेली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP candidate killed in Goa