सुरावली येथील बायपासवर दुचाकीवरुन पडून जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा मृत्यू
By सूरज.नाईकपवार | Updated: December 8, 2023 17:46 IST2023-12-08T17:46:03+5:302023-12-08T17:46:54+5:30
जखमी अवस्थेत तरुणाला गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले असता, गुरुवारी त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुरावली येथील बायपासवर दुचाकीवरुन पडून जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा मृत्यू
मडगाव: गोव्यातील सासष्टीतील सुरावली येथील बायपासवर दुचाकीवरून तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या संघर्ष सुशांत लोलयेकर या २४ वर्षीय दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. बांबोळी येथील गोमेकॉत त्याचे निधन झाले. मयत मूळ काणकोण येथील रहिवाशी आहे.
गुरुवारी रात्री सव्वा आठच्या दरम्यान अपघाताची वरील घटना घडली होती. मयत नुवे येथून दुचाकीवरुन येत असताना, त्याचा तोल गेला व तो अचानक रस्त्यावर खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा पोहचली होती. जखमी अवस्थेत त्याला गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले असता, गुरुवारी त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोलवा पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष गावकर पुढील तपास करीत आहेत.