शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:04 IST

राज्यात आतापर्यंत ३०० जणांनी केली नोंदणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या युवकांना तीन ते सहा महिन्यांचे मोफत कौशल्य प्रशिक्षण व हमखास रोजगार दिला जाईल. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून राज्यात आतापर्यंत ३०० जणांनी केली नोंदणी केली आहे.

दुसरीकडे 'सरकार तुमच्या दारी,' उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून येत्या ६ रोजी फोंड्यात राजीव कला मंदिरात पहिला कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. माझ्या सरकारच्या कार्यकाळात 'सरकार तुमच्या दारी'चे १८ ते १९ कार्यक्रम झाले. प्रत्येक कार्यक्रमाला दोन ते अडीच हजार लोक त्यांच्या अडी-अडचणी घेऊन येत असत. उपस्थितांपैकी ८० टक्के लोकांच्या समस्या या उपक्रमातून आम्ही दूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र सरकार व राज्यातील ग्रामीण विकास यंत्रणा दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजना राबवत असून उद्योगाला लागणारे मनुष्यबळ तयार केले जात आहे. हाउसकीपिंग, फ्रंट ऑफिस, वेअर हाऊसिंग, रिटेल सेल आदी नोकऱ्या यामुळे निर्माण होऊ शकतील. उमेदवारांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल, तसेच मोफत गणवेश, जेवण व शैक्षणिक साहित्यही विनामूल्य पुरवले जाईल. वसतिगृहामध्ये निवास व्यवस्थाही मोफत केली जाईल, असेही ते म्हणाले. 

वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील व्यक्तीला पार्टिसिपेशन आयडेंटिफिकेशन प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने द्यावे लागेल, तसे निर्देश पंचायतींना मी दिलेले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजना राबवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. पर्यटन, आरोग्य क्षेत्र, आयटी, लॉजिस्टिक या क्षेत्रात रोजगारासाठी मनुष्यबळ निर्माण केले जाईल.

१३ प्रशिक्षण कार्यशाळा आतापर्यंत झालेल्या आहेत. शैक्षणिक पात्रता आठवी ते दहावी असली तरी सुद्धा पदवीधर उमेदवार देखील लाभ घेऊ शकतात.

७०% प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना शंभर टक्के रोजगार मिळेल याची ग्वाही सरकार देत आहे. काही पंचतारांकित हॉटेलची सरकारने हात मिळवणी केलेली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for Unemployed: CM Pramod Sawant Announces Key Information

Web Summary : Goa offers free skill training and guaranteed jobs to youth via Deendayal Upadhyay scheme. 'Sarkar Tumchya Dari' initiative restarts, addressing citizen issues. Training covers housekeeping, retail, more, with free lodging. Goa is first to implement the scheme, targeting tourism, IT jobs.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतState Governmentराज्य सरकारUnemploymentबेरोजगारीjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन