भाटीकर समर्थक पंच भाजपात दाखल; तडकाफडकी प्रवेश केल्याने चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2024 08:01 IST2024-01-16T08:00:30+5:302024-01-16T08:01:40+5:30
स्थानिक आमदार आणि कृषीमंत्री रवी नाईक यांच्या उपस्थितीत भाजप पक्षामध्ये रितसर प्रवेश केला.

भाटीकर समर्थक पंच भाजपात दाखल; तडकाफडकी प्रवेश केल्याने चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क, खांडेपार : कुर्दी-खांडेपार पंचायतीचे पंच नीळकंठ नाईक यांनी तडकाफडकी स्थानिक आमदार आणि कृषीमंत्री रवी नाईक यांच्या उपस्थितीत भाजप पक्षामध्ये रितसर प्रवेश केला.
कुर्टी खांडेपार पंचायतीमध्ये कालच सरपंच पदाची निवडणूक होऊन त्यामध्ये हरेश नाईक सरपंचपदी विराजमान झाले. त्यावेळी विरोधी गटातील आणि केतन भाटीकर समर्थक नीळकंठ नाईक हे सरपंच पदाच्या निवडणुकीवेळी उपस्थित होते.
त्याचवेळी काही जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अचानक संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, भाजप नेते दामू नाईक आणि स्थानिक आमदार तसेच कृषी मंत्री रवी नाईक यांच्या उपस्थितीत पणजी येथे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहामध्ये भाजप पक्षामध्ये रितसर प्रवेश केला.
नीळकंठ नाईक हे केतन भाटीकर समर्थक होते पण आज त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश करून सध्याच्या पंचायतीमधील सत्ताधारी गटाला समर्थन दिल्याचे यातून आता दिसून येत आहे.