Beating mother and father in front of a dumb girl | मुक्या मुलीसमोर आई-वडिलांना बेदम मारहाण

मुक्या मुलीसमोर आई-वडिलांना बेदम मारहाण

फोंडा : माणूस खाली पडलेला आहे... मारहाण करणारे त्याला लाठीकाठीने बेदम मारताहेत... त्याला वाचवायला त्याची बायको येथे तिलापण डोके फुटेपर्यंत मारहाण करण्यात येते.... दोघेही मारहाणीमुळे अर्धमेले होऊन खाली पडतात. तरी हे मारहाण करणारे त्यांना दंडुक्याने मारहाण करत राहतात. काहीच हालचाल होत नाही तरीही त्यांचा हा प्रकार थांबत नाही. वृत्तवाहिन्यांमध्ये असे चित्र हमखास पहावयास मिळते.ती घटना भारतातल्या कुठल्यातरी भागात घडलेली असते. असले काहीसे चित्र शांतताप्रिय गोव्यात घडले तर तुमचा विश्वास बसेल...? परंतु नेमकी अशीच एक घटना मडकई-फोंडा येथे घडली असून, संपूर्ण मारहाण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाल्यानेच मारहाण करणाऱ्यांना आता पळताभुई थोडी झाली आहे.
खºया गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाºया पोलिसांचा कामचुकारपणा उघड झाला आहे. तर दोषीवर वरदहस्त ठेवणाºया काही राज्यकर्त्यांचे पितळही उघड पडले आहे. प्राप्त माहितीनुसार, पारंपई -मडकई येथील देवदत्त नाईक व सदानंद नाईक यांच्यामध्ये काही वर्षे मालमत्तेवरून वाद चालू आहे. त्यांच्यामध्ये वारंवार शाब्दिक चकमकी उडतात. कधी कधी प्रकरण देवदत्त याला मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. सहा जून रोजी याच जुन्या वादाचे पर्यवसान अमानुष मारहाण करण्यापर्यंत गेले. सदानंद नाईक, सुनंदा नाईक, भालचंद्र नाईक, सिद्धार्थ नाईक व सोमनाथ नाईक यांनी सदानंद व त्याच्या पत्नीला दंडुके व लोखंडी अवजारांनी अमानुष मारहाण सुरू केली. सदानंदला जखमी करून अर्धमेल्या अवस्थेत सोडल्यानंतर, हल्लेखोरांनी त्याची पत्नी सुनिता नाईक यांनासुद्धा मिळेल त्या अवजाराने मारण्यास सुरुवात केली. दाम्पत्याची एक मुलगी मुकी आहे. आई-बाबांना मारहाण होताना बघून ती मदतीसाठी शेजाºयांकडे धावली. शेजारी आल्यानंतर त्यांनी तिथून काढता पाय घेतला. लोक आले नसते तर कदाचित या दोघांचा बळी घेऊनच हे लोक थांबले असते. सीसीटीव्हीमधले दृश्य बघून मारहाण करणाºयांची चीड येऊन थरकाप उडतो.
>सीसीटीव्हीमुळे सत्य उघडकीस...
नाईक दाम्पत्याला रक्तबंबाळ करून अर्धमेल्या अवस्थेत सोडल्यानंतर मारहाण करणाºयांनी राजकीय गॉडफादरच्या जोरावर पोलीस ठाणे गाठले व अर्धमेल्या अवस्थेत पडलेल्या देवदत्त नाईक व त्याच्या पत्नीवर मारहाणीची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी हे चोर सोडून संन्याशाला फासावर लटकण्यासाठी सर्व तयारी केली होती. आरोग्य यंत्रणेने पण राजकीय व्यक्तीला हवी तशीच व्यवस्था केली होती. त्यावेळी कुणालाच माहीत नव्हते की देवदत्त नाईकने आपल्या झोपडीवजा घरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवली होती. मारहाणीचे संपूर्ण रेकॉर्डिंग झाल्याने त्यांना पाठीशी घालणाºया सगळ्यांचे धाबे दणाणले. जास्त नाचक्की झाली ती पोलिसांची. ज्यांना ते पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या शोधार्थ, आता ते फिरत आहेत. कारण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
दररोजच्या वादातून सदानंद व त्याचे कुटुंबीय कधीतरी आपल्यावर जीवघेणा हल्ला करतील या भीतीने देवदत्त याने सीसीटीव्ही यंत्रणा बसवली होती, ती आज त्याला निर्दोष सिद्ध करायला पुरेशी होऊ शकते. अन्यथा अमानुष मारहाण सोसूनही त्याला पोलिसांनी हॉस्पिटलमधून थेट कोठडीत पोहोचवले असते. सरकारी वकील सत्यवान देसाई यांचा जोरदार युक्तिवादही या लोकांच्या अमानुष हत्येचा बुरखा पाडण्यास कारणीभूत ठरला.

Web Title: Beating mother and father in front of a dumb girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.