राज्याबाहेर जाण्याची परवानगी द्या, बाणास्तारी अपघातातील संशयिताची न्यायालयाकडे मागणी
By पूजा प्रभूगावकर | Updated: February 13, 2024 18:28 IST2024-02-13T18:28:26+5:302024-02-13T18:28:42+5:30
बाणास्तारी पुलावर घडलेल्या अपघातात प्रमुख संशयित आहे परेश सिनय सावर्डेकर

राज्याबाहेर जाण्याची परवानगी द्या, बाणास्तारी अपघातातील संशयिताची न्यायालयाकडे मागणी
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: राज्याबाहेर जाण्याच्या परवानगीसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल सादर करावा असे निर्देश बाणास्तारी अपघातातील प्रमुख संशयित परेश सिनय सावर्डेकर याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले आहेत.
बाणास्तारी पुलावर हा अपघात ऑगस्ट मध्ये झाला होता. या अपघातास जबाबदार असलेली मर्सिडीज गाडी ही परेश सावर्डेकर चालवत होता. त्यावेळी गाडीत त्याची पत्नी मेघना सावर्डेकर ही सुध्दा होती. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले होते. यात दिवाडी येथील पती पत्नीचा तसेच बांदोडा येथील एका युवकाचा समावेश होता. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले होते.
या अपघातामुळे राज्यात या अपघात प्रकरणी परेश सावर्डेकर याला म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर असला तरी त्याला राज्याबाहेर न जाण्याची अट न्यायालयाने घातली आहे.