नवा पक्ष स्थापनेसाठी बाबूशच्या हालचाली
By Admin | Updated: May 19, 2014 01:31 IST2014-05-19T01:26:44+5:302014-05-19T01:31:05+5:30
पणजी : लोकसभा निवडणूक निकालात काँग्रेसचा धुव्वा उडाल्यानंतर आता नवा प्रादेशिक पक्ष स्थापण्याच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे.

नवा पक्ष स्थापनेसाठी बाबूशच्या हालचाली
पणजी : लोकसभा निवडणूक निकालात काँग्रेसचा धुव्वा उडाल्यानंतर आता नवा प्रादेशिक पक्ष स्थापण्याच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. प्रसंगी काँग्रेस पक्ष सोडण्याची तयारी बाबूश यांनी ठेवली आहे. सांताक्रूजचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी यास दुजोरा दिला. प्रादेशिक पक्ष काढण्याचा प्रस्ताव घेऊन काहीजणांनी आपल्याकडे संपर्क साधला असल्याचे व त्याबाबत गंभीरपणे विचार चालू असल्याचे त्यांनी सांगितले. बाबूश यांचे सहकारी आमदार पांडुरंग मडकईकर हे सध्या गोव्याबाहेर आहेत. ते गोव्यात परतल्यानंतरच या प्रस्तावाला चालना मिळेल. आपण मडकईकर यांच्याशी, तसेच इतरांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेणार असल्याचे बाबूश म्हणाले. काँग्रेसच्या पडझडीला बाबूश यांनी स्थानिक नेतृत्वालाच जबाबदार धरले आहे. भाजपशी सामना करण्याचे धाडस या नेत्यांना नाही, असे त्यांनी याआधी म्हटले आहे. (प्रतिनिधी)