दरदिवशी सरासरी १00 पर्यटक घेतात तत्काळ व्हिसा
By Admin | Updated: December 27, 2014 01:11 IST2014-12-27T01:05:31+5:302014-12-27T01:11:12+5:30
‘व्हिसा आॅन अरायव्हल’ : १0९१ जणांना लाभ

दरदिवशी सरासरी १00 पर्यटक घेतात तत्काळ व्हिसा
पणजी : गोव्यात दाबोळी विमानतळावर व्हिसा आॅन अरायव्हल सुविधेचा आतापर्यंत १0९१ पर्यटकांनी लाभ घेतलेला आहे. विमानळावर उतरल्यानंतर या सर्वांना व्हिसा देण्यात आला. दर दिवशी सरासरी १00 विदेशी पर्यटक याचा लाभ घेत आहेत.
४ डिसेंबरपासून ही सुविधा सुरू झाली असून ४३ देशांच्या पर्यटकांना येथे उतरल्यानंतर व्हिसा मिळविण्याची सोय आहे. पुढील काही दिवसांत लाभधारकांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता इमिग्रेशन कार्यालयाचे मुख्य अधिकारी अरविंद कुमार नायर यांनी व्यक्त केली. आतापर्यंत सर्वाधिक लाभार्थी रशियाचेच आहेत. रशिया (५९५), युक्रेन (४३0), अमेरिका (२५), जर्मनी (१५), संयुक्त अरब अमिरात (७), आॅस्ट्रेलिया (४), फिलिपाईन्स (४), इस्रायल (३), जॉर्डन (३), न्यूझिलंड (२), ब्राझिल, फिनलँड, केनया, नॉर्वे आणि सिंगापूर (प्रत्येकी १) अशा पर्यटकांनी या सुविधेचा लाभ घेतला. आणखी काही देशांसाठीही या सुविधेचा विस्तार
होणार असून लंडनच्या पर्यटकांना
लाभ मिळाल्यास गोव्याला
त्याचा फायदा होईल. (प्रतिनिधी)