शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पणजीतील लक्षवेधी लढतीकडे लागले लक्ष; तीन माजी मुख्यमंत्रीही रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 11:04 IST

गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान तोंडावर आले असले, तरी कार्यकर्ते सक्रिय झालेले नाहीत. येथे प्रचाराला कार्यकर्ते कमी पडत असल्याने महाराष्ट्रातून कार्यकर्ते आयात करण्याची वेळ नेत्यांवर आली आहे.

राजेश निस्ताने -पणजी : गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे; परंतु सर्वाधिक लक्षवेधी लढत ही राजधानी पणजीतील ठरणार आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा पणजी हा परंपरागत मतदार संघ; परंतु येथे त्यांचा मुलगा उत्पल यालाच भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्याऐवजी काँग्रेसमधून आलेल्या बाबूश मॉन्सेरात यांना आपला उमेदवार बनविले आहे.

‘मनी आणि मसल पॉवर’ हा बाबूश यांचा प्लस पॉइंट ठरला आहे. दुसऱ्या मतदारसंघातून लढण्याची पक्षाने दिलेली ऑफर उत्पल यांनी धुडकावून पणजी या आपल्या वडिलांच्या मतदारसंघातच अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात शड्डू ठोकला आहे.  मनोहर पर्रीकरांच्या मुलालाच भाजपने तिकीट नाकारले, एवढ्याच एका कारणावरून पणजीतील निवडणूक देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा दिला. भाजपचे बाबूश मॉन्सेरात, ‘आप’चे वाल्मीक नाईक, काँग्रेसचे एलवीस गोनेस, आरजीपीचे राजेश रेडेकर हेसुद्धा प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. गोवा भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सांकली मतदारसंघातील लढतही महत्त्वाची मानली जाते. याशिवाय चर्चिल आलेमाव, रवी नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर हे तीन माजी मुख्यमंत्रीसुद्धा रिंगणात आहेत. हे तिघेही तीन वेगवेगळ्या पक्षांकडून लढत आहेत.

प्रचारासाठी महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांची ‘आयात’ -    गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान तोंडावर आले असले, तरी कार्यकर्ते सक्रिय झालेले नाहीत. येथे प्रचाराला कार्यकर्ते कमी पडत असल्याने महाराष्ट्रातून कार्यकर्ते आयात करण्याची वेळ नेत्यांवर आली आहे.-    महाराष्ट्रातून प्रमुख पक्षांचे अनेक नेते प्रचारासाठी गोव्यात आले आहेत. त्यांच्याकडे विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी पक्षाने दिली आहे. मात्र, येथे बुथवर बसायलाही पक्षाचा कार्यकर्ता उपलब्ध नाही. त्यामुळे या नेत्यांपुढे पेच पडला आहे. कोकण, कोल्हापूर, सोलापूर या नजीकच्या भागातून आलेल्या अनेक नेत्यांनी आपल्या मतदारसंघातून शंभरावर कार्यकर्ते प्रचारासाठी गोव्यात बोलविले आहे.

कार्यालयात शुकशुकाटगोव्यात काँग्रेसचे तर फारसे नियोजन दिसत नाही. बाहेरून येणाऱ्या नेत्यांना निवडणुकीबाबत स्थानिक अपडेट माहितीही दिली जात नसल्याची ओरड आहे.  बाहेरून येणाऱ्या स्टार प्रचारकांच्या भेटीगाठी, स्वागतासाठी प्रदेश सरचिटणीस किंवा अन्य पदाधिकारी उपस्थित राहत नसल्याची खंत काही नेत्यांनी बोलून दाखविली. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टी