शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

लेस्टर मारहाण प्रकरणामुळे एफसी गोवा फॅन क्लबमध्ये संतापाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 7:13 PM

गोमंतकीयांचा लाडका असलेल्या एफसी गोवा संघाच्या परफॉर्मन्समुळे या क्लबचे चाहते खुशीत असले तरी याच एफसी गोवा फॅन क्लबच्या लेस्टर डिसोझा या 20 वर्षीय युवकाला चार दिवसांपूर्वी गोव्यात आयएसएल सामन्यानंतर पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे संतापाचे वातावरण पसरले आहे.

मडगाव: गोमंतकीयांचा लाडका असलेल्या एफसी गोवा संघाच्या परफॉर्मन्समुळे या क्लबचे चाहते खुशीत असले तरी याच एफसी गोवा फॅन क्लबच्या लेस्टर डिसोझा या 20 वर्षीय युवकाला चार दिवसांपूर्वी गोव्यात आयएसएल सामन्यानंतर पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे संतापाचे वातावरण पसरले आहे. अशातच अजूनही त्या पोलिसांविरोधात गुन्हा नोंद न झाल्याने सोशल मीडियावर संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.मागच्या गुरुवारी एफसी गोवा आणि दिल्ली डायनामोज यांच्यात फातोर्डा मैदानावर झालेल्या सामन्यानंतर हे मारहाणीचे नाटय़ घडले होते. मैदानावर फोटो काढत असताना आयआरबीच्या पोलिसांकडे वादावादी झाल्यानंतर पोलिसांकडून त्याला जबरदस्त मारहाण झाली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या लेस्टरला इस्पितळात दाखल करावे लागले होते. या प्रकरणात आयआरबीचे पोलीस उपनिरीक्षक रौनक कदम व दत्तप्रसाद तोरस्कर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. या पोलिसांवर कारवाई झाली नाही तर या प्रकाराविरोधात मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितली जाणार असे लेस्टरचे वडील सेबी डिसोझा यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणात खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश गोव्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी दिले आहेत. यासंदर्भात फातोर्डा पोलीस स्थानकावरही तक्रार दिली आहे. मात्र सरकारी इस्पितळाकडून अद्याप दुखापतीचा अहवाल न आल्याने चौकशी रेंगाळल्याची माहिती फातोर्डा पोलीस स्थानकाचे निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली. यासंदर्भात दक्षिण गोवा जिल्हाधिका:यांनी न्यायदंडाधिका:यांकडून स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी आमआदमी पक्षाने केली आहे.दरम्यान, लेस्टर यांचे वडील सेबी डिसोझा यांनी सोमवारी दक्षिण गोवा पोलीस अधिक्षकाकडे नव्याने तक्रार दाखल केली असून आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. या तक्रारीची प्रत पोलीस महासंचालकांनाही देण्यात आली आहे. याबाबतीत पोलिसांवर कारवाई झाली नाही तर आम्ही मानवाधिकार आयोगाकडे आमची तक्रार मांडू असे डिसोझा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.मागच्या गुरुवारी एफसी गोवा आणि दिल्ली डायनामोज यांच्या दरम्यान फातोर्डा येथे झालेल्या फुटबॉल सामन्यानंतर ही घटना घडली होती. सामन्यानंतर फोटो काढताना आयआरबी पोलिसांनी त्यांना अडविले होते. यावेळी अडविणारे पोलीस हे माहीत नसल्याने डिसोझा आणि पोलिसात वादावादी झाली होती. या वादावादीनंतर पोलिसांनी लेस्टर याला मैदानात नेऊन त्याला मारहाण केली होती. या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमांतून तीव्र संतापाची लाट उसळली होती. पोलिसांवर कारवाई होत नसेल तर या पुढील फुटबॉल सामन्यांवर बहिष्कार घाला अशी मागणी नेटीझन्सकडून केली जात आहे.मानही हलविता येत नाहीपोलिसांनी केलेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या लेस्टरवर सध्या म्हापशातील एका खाजगी इस्पितळात उपचार चालू असून या मारामुळे लेस्टरला आपली मानही हलविता येत नाही असे त्याचे वडील सेबी डिसोझ यांनी लोकमतकडे बोलताना सांगितले. सेबीला झालेली मारहाण अमानूष या प्रकारात मोडणारी होती असे ते म्हणाले. माङया मुलाकडून जर कुठलीही चुक झाली होती तर पोलिसांना त्याला अटक करता आली असती. कित्येक पोलिसांनी त्याला एकटे गाठून मारहाण करण्याची काय गरज होती असा सवाल त्यांनी केला. आके-बायशचे सरपंच सिद्धेश भगत यांनी रविवारी लेस्टरची म्हापसा इस्पितळात जाऊन भेट घेतली. लोकमतशी बोलताना भगत म्हणाले, लेस्टरची हालत बरीच गंभीर असून पोलिसांकडून अशी अपेक्षा नव्हती असे ते म्हणाले. पोलिसांची ही मारहाण म्हणजे कायदा सांभाळणा:यांनीच कायदा हातात घेण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.