शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ५०७ फसव्या वेबसाइट, तर ७६७ मोबाइल क्रमांक ब्लॉक; लोकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 13:01 IST

गोवा पोलिसांची मोठी कारवाई : ६६० वेबसाइटच्या विरोधात तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील वाढत्या सायबर फसवणुकांवर कठोर कारवाई करत गोवापोलिसांच्यासायबर क्राइमपोलिस ठाण्याने वर्ष २०२५ मध्ये मोठी मोहीम राबवली आहे. लोकांना गंडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सायबर गुन्हेगारी संबंधित ५०७ फसव्या वेबसाइट आणि ७६७ मोबाइल क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत.

यावर्षी एकूण ६६० वेबसाइटच्या विरोधात तक्रारी आल्या होत्या. चौकशीनंतर त्यातील ५०७ बनावट किंवा फसव्या वेबसाइट्स असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्या ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

१५१ सोशल मीडिया अकाउंट्स आणि २ संशयास्पद मोबाइल अॅप्सही ब्लॉक करण्यात आली असल्याची माहिती सायबर विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली; तसेच दूरसंचार कंपन्यांच्या सहकार्याने ७६७फसवणुकीसाठी वापरण्यात येणारे मोबाइल नंबर ब्लॉक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांना आवाहन

गोवा पोलिस डिजिटल सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून नागरिक, पर्यटक आणि व्यवसाय क्षेत्रासाठी सुरक्षित ऑनलाइन वातावरण निर्माण करण्यासाठी तत्पर असल्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले. नागरिकांनी संशयास्पद वेबसाइट्स, संदेश किंवा फोन नंबर तत्काळ चक्षु पोर्टल किंवा सायबर क्राइम प्लॅटफॉर्मवर कळवावेत आणि आर्थिक पाटला फसवणूक झाल्यास १९३० वर कॉल करून मदत घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मे महिना सर्वाधिक गंभीर

फसवणुकीच्या या प्लॅटफॉर्ममध्ये बनावट पार्सल डिलिव्हरी संदेशांद्वारे पैसे उकळणे, ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक, सेक्सटॉर्शन, डेटिंग अॅपद्वारे खंडणी, पोलिस किंवा कस्टम्सचा आव आणून केले जाणारे डिजिटल अरेस्ट स्कॅम आणि पर्यटकांना लक्ष्य करणाऱ्या खोट्या हॉटेल बुकिंग वेबसाइट्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.

मे २०२५ हा महिना सर्वाधिक गंभीर २ ठरला असून या महिन्यात तब्बल २५८ वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आल्या होत्या. जानेवारीत ७८ आणि जून महिन्यात ७२ वेबसाइट्सवर कारवाई झाली. त्यामुळे या वर्षातील ही सायबर गुन्ह्यांसंबधी सर्वात मोठी कारवाई आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Police Blocks 507 Fake Websites, Warns Public of Cyber Frauds.

Web Summary : Goa Police Cyber Crime Cell blocked 507 fraudulent websites and 767 mobile numbers in 2025. Complaints involved fake parcel deliveries, investment scams, sextortion, and fake hotel bookings. The public is urged to report suspicious activity via the Chakshu portal or Cyber Crime platform and call 1930 for financial fraud assistance.
टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइम