शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

कलाकार विद्यार्थ्यांना येणार ‘अच्छे दिन’!

By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST

क्रीडापटू विद्यार्थ्यांना मिळणारे गुण आता गायन, नृत्य, थिएटर आर्ट इत्यादी कलांत प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहेत. माध्यमिक आणि उच्च

क्रीडापटू विद्यार्थ्यांना मिळणारे गुण आता गायन, नृत्य, थिएटर आर्ट इत्यादी कलांत प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात क्रीडा धोरणानंतर आता सांस्कृतिक धोरणही तयार होत आहे.शिक्षण क्षेत्रासाठी राज्याचे सांस्कृतिक धोरण आकार घेत असून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांत शिकणाऱ्या कलाकार विद्यार्थ्यांसाठी ही चांगली खबर आहे. नृत्य, नाट्य, गायन, वादन आणि इतर कलांचा या धोरणात समावेश असून राज्याच्या कला आणि संस्कृती खात्याकडून या धोरणाचा मसुदा बनविण्याचे काम सुरू आहे. मसुदा तयार झाल्यानंतर तो मान्यतेसाठी सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.याविषयी माहिती देताना कला आणि संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले की, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी सांस्कृतिक धोरण बनविण्याचे काम सुरू आहे. क्रीडापटू विद्यार्थ्यांप्रमाणेच कलाकार विद्यार्थ्यांसाठीही फायदा मिळवून देणारे धोरण व्हावे, यासाठी लोकांची पत्रे व इतर माध्यमांतून सूचना आल्या. त्यामुळेच हा विचार घेऊन धोरणाचा मसुदा बनविण्याचे काम सुरू करण्यात आले. तज्ज्ञांची मदत घेऊन या धोरणाचा मसुदा बनविणे सुरू आहे. या धोरणाचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांना याविषयी विचारले असता, शैक्षणिक क्षेत्रात क्रीडा धोरणानंतर आता सांस्कृतिक धोरणही बनत आहे, ही चांगली गोष्ट आहे. या बाबतीत शिक्षण खात्याची भूमिका अत्यंत सकारात्मक राहील, असे त्यांनी सांगितले.