शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

पाणीबाणीतही लोकांच्या अनास्थेचे दर्शन; राज्यकर्त्यांना खडसावून सवाल कधी करणार आहोत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 6:39 PM

गोव्यात सात दिवस पाणी नव्हते. पाइपलाइन फुटली आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणातून लोकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. या काळात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना कुठे होत्या?

राजू नायकपाणी टंचाईने ग्रासलेल्या पणजी राजधानी व तिसवाडी तालुक्यातील जनतेला सरकार ज्याप्रमाणे आश्वस्त करू शकले नाही, त्याचप्रमाणे त्यांच्या वेदनेला वाचा फोडण्यास विरोधी पक्षांना अपयश आले. केवळ प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न लढविला. याचे कारण कॉँग्रेससारखा पक्ष सरकारची खुशामत करीत होता व ‘आप’ला सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ निदर्शने करायला मुहूर्त सापडला. तेव्हाही १० कार्यकर्ते व ५० पेक्षा जास्त पोलीस अशी परिस्थिती होती. विरोधी पक्षनेत्याने सरकारविरोधात ‘ब्र’ काढला नाही.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले, सार्वजनिक तिजोरीवर गलेलठ्ठ होणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना लोक म्हणून आपण खडसावून सवाल कधी करणार आहोत? लोक संतापले आहेत, त्यांच्यात असंतोष भडकत आहे वगैरे आम्ही पत्रकार लिहीत होतो. परंतु एक-दोन नगरसेवकांना फोन केल्यानंतर आपल्याला टॅँकर येतो ना, मग उगाच पावसात आंदोलन का करा, असा ‘सुज्ञ’ विचार लोकांनी केला असावा. परंतु ‘जनता’ म्हणून आपला आवाज उठविण्याचा अधिकार ते कधी बजावणारच नाहीत का?

सध्या गोव्यात विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. कॉँग्रेसचे इनमीन पाच सदस्य बाकी राहिले आहेत. त्यातील अनेकांवर केसेस आहेत. काहींना अधूनमधून पोलीस स्थानकावर हजेरी लावावी लागते. काहींवर ते भाजपमध्ये येण्यात एका पायावर तयार असण्याचीही टीका झाली आहे. हे लोक जनतेचे प्रश्न घेऊन काय लढणार आहेत? त्यातील काहीजण तर मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने उधळण्याची एकही संधी वाया घालवत नाहीत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व ‘आप’चेही काही खरे नाही. मगोपने सरकारविरोधात बसण्याचे धोरण स्वीकारले होते. परंतु त्याच्या विपरीत विधानसभेत एका फुटकळ सत्काराचे निमित्त साधून मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून त्यावर अडीच तास चर्चा केली, जी रात्री १२ पर्यंत चालली. हे ढवळीकर सरकारविरोधात बोलण्याचे धारिष्ट्य काय दाखवतील?

‘आप’ची लोकप्रियता ढळल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते रोडावले आहेत. त्याची परिणती म्हणजे पणजीतील निदर्शनांना मोजून दहा जण हजर होते. परंतु विरोधी पक्षांची आजची ही दयनीय अवस्था जनतेच्याच अनास्थेचे प्रतीक नाही का? जे लोक पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर केवळ घरात बसून आक्रंदत होते तेच रस्त्यावर येण्यास नाखुश होते. एकाही सामाजिक संस्थेने मोर्चा काढण्यास पुढाकार घेतला नाही. येथे महिला संघटना अनेक आहेत. परंतु त्याही सुखवस्तू असल्याने एकही मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, अहिल्या रांगणेकर काही गोव्यात निर्माण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे जी पाइपलाइन ४८ तासांत दुरुस्त होऊ शकली असती ते काम सात दिवस उलटूनही पूर्ण होऊ शकले नाही आणि दोन तालुक्यांना पाण्याविना तडफडावे लागले. ज्या देशातील नागरिक निष्प्रभ आणि मुर्दाड असतात, त्या देशाला भवितव्य नसते, असे एका विचारवंतांने लिहून ठेवले आहे आणि त्यातल्या त्यात गोव्याचे अस्तित्व तर सध्या कड्याच्या टोकाला पोहोचले आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईgoaगोवा