दहशतवादी कारवायांचा धोका असल्याने गोव्यात दोन महिन्यांसाठी जमावबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 19:08 IST2020-02-12T19:06:56+5:302020-02-12T19:08:06+5:30
पश्चिम किनारपट्टीवर अतिरेकी कारवायांचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्याने गोव्यात दोन महिन्यांसाठी जमावबंदीचे कमल १४४ लागू करण्यात आले आहे.

दहशतवादी कारवायांचा धोका असल्याने गोव्यात दोन महिन्यांसाठी जमावबंदी
पणजी : पश्चिम किनारपट्टीवर अतिरेकी कारवायांचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्याने गोव्यात दोन महिन्यांसाठी जमावबंदीचे कमल १४४ लागू करण्यात आले आहे.
उत्तरेच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर. मेनका यांनी काढलेल्या आदेशात पुढील ६0 दिवस १0 एप्रिलपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर दहशतवादी कायवायांचा धोका असल्याचे गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. गोव्यातही धोका असल्याने हा आदेश काढण्यात आला आहे.
या आदेशात जिल्हाधिकारी म्हणतात की,‘मानवी जीवनाला धोका पोचविणाºया कारवायांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांकडून कोणत्याही घातपाती कारवाया होऊ नयेत तसेच राज्याच्या सुरक्षेला धोका पोचू नये यासाठी जमावबंदी लागू केली जात आहे.
भाडेकरु ठेवताना त्यांची संपूर्ण माहिती घरमालक, सदनिकामालक, हॉटेल्स, लॉजिंग व बोर्डिंग, खाजगी गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट हाउसमालक व धार्मिक संस्थांनी घ्यावी, असे या आदेशात बजावण्यात आले आहे.