राहुल गांधींपाठोपाठ लष्करप्रमुखांनी मनोहर पर्रीकरांची भेट घेतली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 15:58 IST2019-01-31T15:55:52+5:302019-01-31T15:58:36+5:30

भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी (31 जानेवारी) गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली.

Army Chief Bipin Rawat Meets Manohar Parrikar, Enquires About His Health | राहुल गांधींपाठोपाठ लष्करप्रमुखांनी मनोहर पर्रीकरांची भेट घेतली 

राहुल गांधींपाठोपाठ लष्करप्रमुखांनी मनोहर पर्रीकरांची भेट घेतली 

ठळक मुद्देभारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी मनोहर पर्रीकर यांची भेट घेतलीपर्रीकर यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

पणजी - भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी (31 जानेवारी) गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. लष्करप्रमुख रावत यांनी विधानसभा परिसरात पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीबाबत पर्रीकर यांनी सांगितले की, ''पर्रीकर यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी येथे आलो होतो.''

दरम्यान, या आधी मंगळवारी (29 जानेवारी) काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पर्वरी येथे मनोहर पर्रीकरांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. यावेळी त्यांनी पाच मिनटे पर्रीकर यांच्यासोबत चर्चा केली. पर्रीकर थकलेले दिसत आहेत. तुम्ही आजारी असतानाही सतत काम कसे करता, असे राहुल गांधी यांनी त्यांनी विचारले. यावर,  माझा स्वभावच तसा आहे. त्यानुसार मी काम करतो, असे पर्रीकर म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 


Web Title: Army Chief Bipin Rawat Meets Manohar Parrikar, Enquires About His Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.