शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

स्मशानभूमीवरून वाद, गुडी पारोडाच्या दोनशे ग्रामस्थांनी गाठले पोलीस ठाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 17:05 IST

चारही गावातील लोकांच्या वापरातील या समशानभूमीचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे.

ख्रिस्तानंद पेडणेकर

केपे : स्मशानभूमीची जमीन आमची आहे. जर कोणी आमच्या जमिनीवर हक्क सांगून अत्याचार करू पाहात असेल तर त्याच्याविरोधात न्यायालयात जायला मागे राहणार नाही, असा इशारा गुडी पारोडा येथील ग्रामस्थांनी दिला. पंचायत क्षेत्रातील स्मशानभूमीच्या जमिनीवरून रविवारी वाद उफाळला. जीमी रॉड्रिग्स यांनी ग्रामपंचायतीच्या पंच सदस्य राजश्री गावकर यांच्याविरोधात तक्रार केल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. सुमारे दोनशे लोकांनी बसमधून केपे पोलिस स्थानकावर धडक दिली. त्यामुळे वातावरण तापले. गुडी पारोडा पंचायत क्षेत्रातील ही स्मशानभूमी गुडी, जरीवाडो, तळेवाडी, कार्यागाळ या चार ठिकाणच्या लोकांसाठी वापरली जाते.

चारही गावातील लोकांच्या वापरातील या समशानभूमीचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. स्मशानभूमीच्या जागेमथून जाणारी पायवाट हे या वादाचे मुख्य कारण आहे. अलिकडे हा वाद वारंवार उपस्थित होतो आहे. गुडी पारोडा पंचायत क्षेत्रातील  गावकऱ्यांनी स्मशानभूमीभोवती सिमेंटचे पोल उभे केले. मात्र, काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी सर्व पोल काढून टाकले. त्यामुळे हा मुद्दा यापूर्वीच तापला होता. त्यातच रॉड्रिग्स यांनी पंच राजश्री गावकर यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी पंच गावकर यांना पोलिस ठाण्यात बोलावले. त्यामुळे ग्रामस्थ आक्रम झाले. 

रविवारी केपे पोलिस स्थानकाबाहेर वातावरण तापले होते. ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले की, ज्या जमिनीमुळे हा वाद निर्माण झाला आहे, त्या स्मशानभूमीवर चार गावांचा हक्क आहे. ती कोणाचीही खासगी मालकीची नाही. अनुसूचित जमातीशी संबंधीत  लोकांकडून ही स्मशानभूमी वापरली जाते. याप्रश्न गरज भासल्यास आम्ही कायद्याची लढाई लढू असा इशारा वकील उपासो गावकर यांनी दिला. अंत्यसंस्कारास आडकाठी आणणाऱ्यांविरोधात अनुसूचित जमातीवर अत्याचारासंदर्भात तक्रार आम्ही न्यायालयात दाखल करू, असे त्यांनी सांगितले. पंच गावकर यांनी सांगितले, की, चार ठिकाणच्या लोकांसाठी या स्मशानभूमीचा वापर होतो. मात्र, त्याच्या वापरात आडकाठी आणली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढली. 

टॅग्स :goaगोवा