शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

म्हापशातील श्री देव बोडगेश्वर मंदिरात पुन्हा चोरी; गोव्यात हल्ली चोरट्यांकडून मंदिर टार्गेट

By काशिराम म्हांबरे | Updated: April 29, 2024 11:25 IST

गोव्यात हल्ली चोरट्यांकडून मंदिरांना टार्गेट केले जाते. मागील तीन महिन्यात विविध भागातील मंदिरात चोरीचे प्रकार घडले आहे

म्हापसा- गोव्यासह महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेले तसेच जागृत देवस्थान म्हणून मानले जाणाऱ्या म्हापसा येथील प्रसिद्ध देवस्थान श्री देव बोडगेश्वर संस्थानच्या मंदिरात दोन महिन्यानंतर पुन्हा दुसऱ्यावेळी धाडसी चोरीचा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी मंदिरातील दोन फंडपेटी फोडून त्यातील अंदाजीत १२ लाख रुपयांची रोखड रक्कम लंपास केली आहे. 

गोव्यात हल्ली चोरट्यांकडून मंदिरांना टार्गेट केले जाते. मागील तीन महिन्यात विविध भागातील मंदिरात चोरीचे प्रकार घडले आहे. चार बुरखाधारी चोरट्यांनी मंदिराच्या सुरक्षा रक्षकाला आरंभी मारहाण करून नंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देत त्याता खुर्चीला बांधून मुर्ती समोर असलेल्या तसेच मागच्या बाजूला असलेल्या फंडपेटीतील कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. सदर चोरीची घटना आज सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमाराला घडली आहे.  

दोन महिन्यापूर्वी २८ मार्च रोजी पहाटे ४.३० च्या दरम्यान चोरट्यांनी पादूकांची पेटी  फोडून त्यातील रक्कम चोरली होती. त्यानंतर पोलिसांनी लगेच तपास कार्य सुरु करून कर्नाटकातील दोघा संशयितांना ताब्यात घेतले होते. हा घटनेनंतर घडलेला हा दुसरा चोरीचा प्रकार आहे. प्रथम चार बुरखाधारी चोरट्यांनी मंदिराच्या आवारात प्रवेश केला. नंतर मंदिराच्या आवारात सुरक्षा पुरवणाऱ्या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेऊन त्याला बांधून ठेवले. त्यानंतर मंदिरातील दोन फंडपेटी फोडून त्यातून रोख रक्कम पळवून नेली. घटनेची माहिती उपलब्ध होता. देवस्थानच्या समितीची घटना स्थळी धाव घेतले. त्यानंतर चोरीची माहिती म्हापसा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून तपास कार्य सुरु केले आहे. मंदिरातील सिसिटिव्ही फुटेजची तसापणी केली जात आहे. 

दर दिवशी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. खास करुन बुधवार तसेच विवारच्या दिवशी भाविकांच्या रांगा मंदिरात देवदर्शनासाठी लागलेल्या असतात. भाविक केलेल्या नवसानुसार देवाला वस्तू अर्पणही करीत असतात. घटना पहाटे घडल्याची माहिती अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी दिली. या संबंधी आपण तक्रार दाखल केली असल्याचेही त्यांनी सांगितले.