विष्णू वाघ यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा

By Admin | Updated: August 28, 2016 18:39 IST2016-08-28T18:39:11+5:302016-08-28T18:39:11+5:30

विष्णू वाघ यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा झाल्याचे आघाडीचे न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद. एस. रामाणी यांच्या संदेशाचा हवाला देऊन विष्णू यांचे बंधू रामराव यांनी म्हटले आहे

Another improvement in the health of Vishnu Wagh | विष्णू वाघ यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा

विष्णू वाघ यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा


पणजी : गोवा विधानसभेचे उपसभापती, साहित्यिक विष्णू वाघ यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा झाल्याचे आघाडीचे न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद. एस. रामाणी यांच्या संदेशाचा हवाला देऊन विष्णू यांचे बंधू रामराव यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा इस्पितळाला भेट देऊन वाघ यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
रामराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रामाणी यांनी रविवारी सकाळी विष्णू यांना तपासले. मुख्यमंत्री पार्सेकर तुङया भेटीसाठी आले आहेत, असेही विष्णू यांच्या कानात डॉक्टरांनी सांगितले तेव्हा त्यांच्या चेह:यावर प्रथमच हास्य दिसले. मुख्यमंत्रीही त्या वेळी उपस्थित होते. विष्णू यांच्या चेह:यावर हास्य पाहून मुख्यमंत्र्यांनाही समाधान वाटल्याचे या संदेशात डॉ. रामाणी यांनी म्हटले आहे.
वाघ यांनी दोन दिवसांपूर्वी डोळ्यांच्या पापण्या हलविल्याचे त्यांच्यावर उपचार करणा:या डॉक्टरांनी सांगितले होते. रविवारी त्यांच्या चेह:यावरील हास्याने डॉक्टरांच्या आशा आणखी पल्लवित झाल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Another improvement in the health of Vishnu Wagh