शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कोळसाप्रश्नी पत्र जाहीर करा, काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 20:23 IST

पणजी : मुरगाव बंदर व वास्को शहरात कोळसा हाताळणीच्या प्रकल्पांचा विस्तार नको असे आपण केंद्र सरकारला पत्रद्वारे कळविले असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सांगतात.

पणजी : मुरगाव बंदर व वास्को शहरात कोळसा हाताळणीच्या प्रकल्पांचा विस्तार नको असे आपण केंद्र सरकारला पत्रद्वारे कळविले असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सांगतात. मुख्यमंत्र्यांनी ते पत्र जाहीर करावे, असे आव्हान आपण देत असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी गुरुवारी येथे सांगितले. तसेच वास्कोमध्ये ऑस्ट्रेलियाहून येणारा कोळसा हा वीजनिर्मितीसाठी कुठेच न वापरला जात नाही असेही रेजिनाल्ड यांनी संबंधित कंपन्यांच्या व एमपीटीच्या अहवालाचा आधार घेत सांगितले.गोव्यात हाताळल्या जाणा-या कोळशापासून वीजनिर्मिती होते, असा दावा सरकारने केला होता. तसेच कोळशाला नव्हे तर प्रदूषणाला आक्षेप घ्या असाही सल्ला सरकारने लोकांना देऊन ज्यांना कोळसाच नको, त्यांनी वीज तरी का वापरावी असा प्रश्न केला होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हाऊसमध्ये गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना रेजिनाल्ड म्हणाले, की ऑस्ट्रेलिया व अन्य देशांमधून अदानी व अन्य कंपन्या जो कोळसा मुरगाव बंदरात आणतात व नंतर त्याची वाहतूक केली जाते, तो मुळात कोक आहे. त्याचा वापर वीजनिर्मितीसाठी होत नाही. त्याबाबतची अधिकृत कागदपत्रे वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तो कोक किंवा कोळसा हा पोलाद उद्योगांच्या वापरासाठी जात असतो.रेजिनाल्ड म्हणाले, की 2001 साली वाजपेयी सरकार केंद्रात अधिकारावर असताना केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मोठय़ा प्रमाणात कोळसा हाताळणीच्या कामासाठी वास्को तथा एमपीटीच्या ठिकाणी गोवा सरकारकडे जमीन मागितली होती. त्यावेळी मनोहर र्पीकर हेच मुख्यमंत्री होते व त्यांनी कुणालाही विश्वासात न घेता जमीन दिली. काँग्रेस सरकारच्या काळापासूनच नव्हे तर तत्पूर्वीही अगदी नगण्य स्वरुपात कोळसा हाताळणी एमपीटीमध्ये होत होती. तिचे प्रमाणाच एवढे छोटे होते, की ते कुणाला कळत देखील नव्हते. त्याचा त्रस होण्याचा प्रश्नच नव्हता. अलिकडे मात्र जे काही चालले आहे, त्याचे परिणाम वास्को व परिसरातील लोकांना भोगावा लागतो. यामुळेच मी जेव्हा गेल्या ऑगस्टमध्ये विधानसभा अधिवेशनात वास्कोतील कोळसा प्रदूषणप्रश्नी आवाज उठवला तेव्हा भाजपचे आमदार कालरुस आल्मेदा, अ‍ॅलिना साल्ढाणा, मिलिंद नाईक यांनी मला पाठिंबा दिला होता.रेजिनाल्ड म्हणाले, की मी विधानसभेत कोळसाप्रश्नी आवाज उठवला म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आपण कोळसा हाताळणी विस्ताराला विरोध करत असल्याचे पत्र केंद्र सरकारला पाठवत असल्याची ग्वाही गेल्या 26 जुलै रोजी आपल्याला दिली होती. त्यानंतर गेल्या 1 ऑगस्ट 2017 रोजी आपण मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र लिहिले व त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली व आश्वासन दिल्यानुसार पत्र केंद्र सरकारला पाठवा, अशी विनंती केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात की त्यांनी पत्र केंद्राला पाठवले आहे. तसे असल्यास त्यांनी त्या पत्रची प्रत जरा जाहीर करावी. रेजिनाल्ड म्हणाले, की नद्यांचे राष्ट्रीयीकरणाचा संबंध हा कोळसा हाताळणी प्रकल्पाशी आहेच. शिवाय महामार्ग रुंदीकरणही त्यासाठी केले जात आहे. मुख्यमंत्री केवळ शाब्दीक खेळ सध्या करत आहेत व वास्कोत प्रदूषण आता होत नाही असा दावाही ते करतात हे समजण्यापलिकडचे आहे.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसgoaगोवा