अमृतसिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: February 13, 2015 01:13 IST2015-02-13T01:12:54+5:302015-02-13T01:13:58+5:30
साखळी : प्राणिमित्र अमृतसिंग, गो रक्षा केंद्राचे हनुमंत परब व वासुदेव झरेकर यांच्यावर गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास चोर्लाघाटात

अमृतसिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला
साखळी : प्राणिमित्र अमृतसिंग, गो रक्षा केंद्राचे हनुमंत परब व वासुदेव झरेकर यांच्यावर गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास चोर्लाघाटात अज्ञात इसमांनी हल्ला चढवल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना साखळी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अमृतसिंग यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार प्राणिमित्र अमृतसिंग, गो रक्षा संघटनेचे हनुमंत परब व त्यांचे वाहनचालक झरेकर हे तिघे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास बेळगावहून चोर्लाघाटमार्गे गोव्याकडे येत असताना चोर्लाघाटातील जांबळीकडे या ठिकाणी एका ग्रे रंगाच्या इनोव्हा कारमधून आलेल्या चौघांनी त्यांना अडवले व दंडुक्यांनी जबर मारबडव करून पलायन केले.