शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे दोन आमदार अमित शहांच्या भेटीला, राजीनामा देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 11:24 IST

काँग्रेस पक्ष अखेर फुटीच्या उंबरठय़ावर उभा असून काँग्रेसचे दोन आमदार सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतील. त्यानंतर आमदारकीचा राजीनामा सादर करतील.

पणजी : काँग्रेस पक्ष अखेर फुटीच्या उंबरठय़ावर उभा असून काँग्रेसचे दोन आमदार सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतील. त्यानंतर आमदारकीचा राजीनामा सादर करतील. दोघेही आमदार तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, मंत्री विश्वजित राणे व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे दिल्लीत आहेत.

शिरोडकर हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही आहेत. ते गेले दीड वर्ष भाजपाच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी त्यांचे चांगले नाते तयार झाले होते. मांद्रेचे आमदार सोपटे हे यापूर्वीच्या काळात भाजपामधून फुटून काँग्रेसमध्ये गेले होते. त्यावेळीही त्यांना मंत्री विश्वजित राणे यांनी भाजपामधून काँग्रेसमध्ये आणले होते, पण काँग्रेसच्या तिकीटावर नंतर त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. 2017 च्या निवडणुकीत सोपटे हे काँग्रेसच्या तिकीटावर मांद्रे मतदारसंघात जिंकले. तिथे त्यांनी ज्येष्ठ भाजपा नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पराभूत केले होते. आता सोपटे व शिरोडकर या दोघांनाही भाजपामध्ये प्रवेश दिला जाईल व भाजपाचे तिकीटही दिले जाईल. प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर, मंत्री राणे आदींसोबत शिरोडकर व सोपटे हे अमित शहा यांना भेटतील व मग काँग्रेसमधील फुट अधिकृतरित्या जाहीर केली जाईल, असे सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, मंत्री विश्वजित राणे यांच्याशी पर्रीकर सरकारमधील मंत्री विजय सरदेसाई यांनी मंगळवारी सकाळी फोनवरून संवाद साधला. काँग्रेसमध्ये फुट पडणार याचे भाकित आम्ही केले होते. त्यामुळे काँग्रेसचे दोन आमदार फुटतात याविषयी आमचा आक्षेप असण्याचे कारणच नाही. मात्र सत्ताधारी आघाडीच्या घटक पक्षातील कुठल्याच मंत्र्याला डच्चू दिला जाऊ नये असे मंत्री सरदेसाई यांनी मंत्री राणो यांना सांगितले आहे. मगोपचे मंत्री बाबू आजगावकर यांना डच्चू देऊन सोपटे यांना मंत्री केले जाईल अशा प्रकारची चर्चा राजकीय गोटात आहे पण त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मुख्यमंत्री पर्रीकर हे स्वत: सध्या आजारी असून ते त्यांच्या दोनापावल येथील निवासस्थानीच आहेत. 

टॅग्स :goaगोवाAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेसBJPभाजपा