लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांना पदावरून हटवण्यात आले असून सरचिटणीस श्रीकृष्ण परब यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त ताबा दिला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीतील खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने हा निर्णय घेतल्याचे मानले जाते.
नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाने अत्यंत खराब कामगिरी केली होती. पक्षाने सर्व जागा लढवल्या परंतु केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. २०२० च्या जिल्हा पंचायत निवडणुकीतही पक्षाकडे बाणावलीची एक जागा होती. परंतु ताज्या निवडणुकीत किंचितही प्रगती झाली नाही.
पक्षाचे दोन आमदार विधानसभेत असताना अनेक मतदारसंघांमध्ये डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की आप उमेदवारांवर आली. पालेकर यांना गोवा प्रमुख या पदावरून मुक्त करण्याचा निर्णय पक्षाच्या राजकीय व्यवहार विभागाने जिल्हा पंचायत निवडणुकीतील खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवरच घेतला असल्याचे स्पष्ट होत आहे.
Web Summary : Amit Palekar was removed as AAP Goa chief following poor performance in the recent Zilla Panchayat elections. Shrikrishna Parab assumes additional charge. The party managed only one seat despite contesting all, prompting the decision.
Web Summary : अमित पालेकर को आप गोवा प्रमुख के पद से हटा दिया गया है, जिसका कारण हाल ही में जिला पंचायत चुनावों में खराब प्रदर्शन रहा। श्रीकृष्ण परब को अतिरिक्त प्रभार सौंपा गया है। पार्टी सभी सीटों पर चुनाव लड़ने के बावजूद केवल एक सीट जीत सकी।