शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका रिर्टन्ड बनला सराईत चोरटा, गोव्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 21:03 IST

मडगाव : पूर्वी अमेरिकेत काम करणाऱ्या आणि नंतर मायदेशात परतल्यावर वृद्ध महिलांना हेरुन त्यांच्या अंगावरील सोनसाखळी हिसकावणाऱ्या एक सराईत चोरट्याला गोव्यात अटक करण्यात आली आहे. उमेश ...

मडगाव : पूर्वी अमेरिकेत काम करणाऱ्या आणि नंतर मायदेशात परतल्यावर वृद्ध महिलांना हेरुन त्यांच्या अंगावरील सोनसाखळी हिसकावणाऱ्या एक सराईत चोरट्याला गोव्यात अटक करण्यात आली आहे. उमेश चव्हाण (३९) असे या संशयिताचे नाव असून, तो मूळ महाराष्ट्रातील सावंतवाडी येथील आहे. तो सध्या येथील नावेली भागात रहात होता. २८ मे रोजी सेकरावाडा चिंचणी येथील फिलिपिना पियेदाद फर्नांडीस (७१) ही वृद्द महिला आपल्या घरी जात असताना, दुचाकीवरुन आलेल्या एका अज्ञाताने तिच्या अंगावरील ५० हजार रुपये किमंतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. कुंकळ्ळी पोलिसांनी भादंसंच्या ३५६ व ३७९ कलमाखाली हे प्रकरण नोंदवून घेतले होते.दक्षिण गोवापोलिस अधिक्षक अभिषेक धनिया यांच्या मार्गदर्शनाखाली मडगाव विभागाचे उपअधिक्षक संतोष देसाई, कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण उपनिरीक्षक भरत खरात , कविता रावत , नारायण पाडकर व अन्य पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना संशयित उमेशला गुढी येथे जेरबंद केले.संशयित अमेरीकेतून आल्यानंतर बेकार होता. पदरचे पैसेही त्यांनी संपविले होते. नंतर तो चाेरी करायला लागला. तो वृद्द महिलांना लक्ष्य बनवित होता. सकाळी प्रार्थनेला जाउन घरी परत येणाऱ्या वृध्द महि्लांना हेरुन तो त्यांच्या सोनसाखळ्या पळवित होता. चोरलेल्या सोनसाखळया तो वित्त शाखेत तारणहार म्हणून ठेवून तेथून गोल्ड लॉन घेत होता.वेर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही त्यांनी अशीच एक चोरी केली होती. यापुर्वी मडगाव, कुंकळ्ळी, वेर्णा व कोकण रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीतही त्यांनी चोऱ्या केल्या आहेत. उत्तर गोव्यातही त्याने चोऱ्या केल्या आहेत का याचा सदया पोलिस शोध घेत आहेत. त्याला अधिक तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस