शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी पर्यटकांना अटक होणार, किनाऱ्यांवर पोलिसांचीही नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 19:05 IST

'सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे हा गुन्हाच आहे.'

पणजी : राज्यातील किनाऱ्यांवर  पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आयआरबीचे काही पोलिसही नियुक्त केले जातील. सार्वजनिक ठिकाणी जे पर्यटक दारू पितात व अन्य उपद्रव करतात, त्यांना यापुढे अटक केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी येथे दिला.

अलिकडे वारंवार पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू होत आहे. किनाऱ्यांवर जीवरक्षक असूनही सात पर्यटकांचा या मोसमात मृत्यू झाला तर सुमारे 135 पर्यटकांना बुडताना वाचविले गेले आहे. त्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, की आपण बैठक घेतली व स्थितीचा आढावा घेतला आहे.

परवा बेळगावच्या दोघांचा मृत्यू झाला. या दोघांना समुद्रात उतरू नका, कारण समुद्र खवळलेला आहे, अशी सूचना जीवरक्षकांनी केली होती. पण ते समुद्रात उतरलेच. काहीजण मद्य पिऊन समुद्रात उतरतात व जीव गमावून बसतात. ज्यांनी कधी समुद्रच पाहिलेला नसतो ते समुद्रकिनारा पाहून खूप बेपर्वा वागतात.

मुख्यमंत्री म्हणाले, की सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे हा गुन्हाच आहे. अशा पर्यटकांविरुद्ध कडक कारवाई करण्याची सूचना आपण पोलिसांना केली आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणा-यांना अटकच होईल. पूर्वी अशी मोहीम राबवली गेली होती, आता नव्याने कारवाई व्यापक केली जाईल. तसेच ज्या किना-यांवर जीवरक्षकांसोबत आयआरबीचे अतिरिक्त पोलिसही नियुक्त करण्याची गरज आहे, अशा काही ठिकाणी पोलिसांचीही नियुक्ती केली जाईल.

सर्वच किना-यांवर पोलीस नियुक्त करता येणार नाहीत पण ज्या जागा धोकादायक आहेत, तिथे आयआरबीचे पोलीस निश्चितच नियुक्त होतील.  सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांनी कोणताच उपद्रव करू नये व जीवरक्षकांच्या सूचना ऐकाव्यात असे अपेक्षित आहे.

टॅग्स :goaगोवा