Akola: गुरांची तस्करी करणारा एक अटकेत
By सचिन राऊत | Updated: February 25, 2024 13:59 IST2024-02-25T13:59:07+5:302024-02-25T13:59:19+5:30
Akola Crime News: डाबकी राेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीवास्तव चाैकातून एका गुराची तस्करी करीत असलेल्या आराेपीस नाकाबंदी दरम्यान डाबकी राेड पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Akola: गुरांची तस्करी करणारा एक अटकेत
- सचिन राऊत
अकाेला - डाबकी राेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीवास्तव चाैकातून एका गुराची तस्करी करीत असलेल्या आराेपीस नाकाबंदी दरम्यान डाबकी राेड पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खैर माेहम्मद प्लाॅट येथील अब्दुल वहीद अब्दुल शहीद हा गुराची तस्करी करीत असल्याची माहीती डाबकी राेड पाेलिसांना मीळाली. पाेलिसांची या परिसरात नाकाबंदी सुरु असतांनाच या आराेपीस ताब्यात घेतले. त्याला तस्करी करतांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या प्रकरणी डाबकी राेड पाेलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनीयम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाइ डाबकी राेड पाेलिस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे, असद खान, सुनील टाेपकर, गाेपाल डाेंगरे, दिपक तायडे, प्रवीण इंगळे व मंगेश गीते यांनी केली.