हार्वर्ड विद्यापीठाशी झालेला करार गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. विजय दर्डा यांना दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 07:02 IST2025-01-12T07:02:08+5:302025-01-12T07:02:33+5:30

डॉ. दर्डा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेतली. विविध विषयांवर उभयतांमध्ये तासभर चर्चा झाली.

Agreement with Harvard University is useful for Goa students, Chief Minister Dr. Pramod Sawant informed Dr. Vijay Darda | हार्वर्ड विद्यापीठाशी झालेला करार गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. विजय दर्डा यांना दिली माहिती

हार्वर्ड विद्यापीठाशी झालेला करार गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. विजय दर्डा यांना दिली माहिती

पणजी : हार्वर्ड विद्यापीठाशी गोवा सरकारचा झालेला समझोता करार हा गोव्यातील महाविद्यालयीन व अन्य स्तरांवरील विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कराराविषयी ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांना सविस्तर माहिती दिली.

डॉ. दर्डा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेतली. विविध विषयांवर उभयतांमध्ये तासभर चर्चा झाली. शिक्षण क्षेत्रात विविधस्तरांवर गोवा सरकार खूप चांगले उपक्रम राबवत आहे. नवे प्रयोग करत आहे. त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी डॉ. दर्डा यांना माहिती दिली. गोव्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी नुकताच सरकारने हार्वर्ड विद्यापीठाशी करार केला आहे.

हार्वर्डशी केलेली भागीदारी शैक्षणिक उत्कृष्टता आणि नेतृत्व विकास याबाबत गोमंतकीय विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. हार्वर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी शिक्षकांची भूमिका पार पाडतील आणि गोव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी प्रशिक्षक फेलो म्हणून काम करतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोव्यातील उच्च माध्यमिकस्तरावरील विद्यार्थी, जे कार्यक्रमाचे प्राथमिक लाभार्थी म्हणून या करारानुसार सहभागी होतील. कोणताच विद्यार्थी शिकण्याच्या संधीपासून दूर राहू नये, असा गोवा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच हे उपक्रम व विविध करार केले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.  डॉ. विजय दर्डा यांनी गोवा सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत केले, कौतुक केले. पर्यटन क्षेत्रातही गोव्याने जी चांगली पावले उचलली आहेत, त्यांचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Web Title: Agreement with Harvard University is useful for Goa students, Chief Minister Dr. Pramod Sawant informed Dr. Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.