प्रेमात दुरावा आल्याने प्रेयसीला पाण्यात बुडवून ठार मारून नंतर स्वत: केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 22:40 IST2020-09-28T22:40:16+5:302020-09-28T22:40:23+5:30

निष्कर्षाप्रर्यंत पोलीस येऊन पोहोचले असून, खून म्हणून त्या युवतीचे मृत्यूप्रकरण पोलिसांनी नोंदवून घेतले आहे. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी ही माहिती दिली.

After falling in love, he drowned his girlfriend and later committed suicide | प्रेमात दुरावा आल्याने प्रेयसीला पाण्यात बुडवून ठार मारून नंतर स्वत: केली आत्महत्या

प्रेमात दुरावा आल्याने प्रेयसीला पाण्यात बुडवून ठार मारून नंतर स्वत: केली आत्महत्या

मडगाव : प्रेमात दुरावा निर्माण झाल्यानंतर आपल्या प्रेयसीला पाण्यात बुडवून ठार मारून नंतर स्वतः आत्महत्या करण्याची घटना गोव्यात घडली. काल रविवारी ही घटना घडली होती. आज सोमवारी त्या युवतीच्या मृतदेहाची शवचिकित्सा केली असता, तिच्या गळ्याभोवती जखमा आढळून आल्या. तिला जबरदस्तीने पाण्यात बुडवून नंतर ठार मारले या निष्कर्षाप्रर्यंत पोलीस येऊन पोहोचले असून, खून म्हणून त्या युवतीचे मृत्यूप्रकरण पोलिसांनी नोंदवून घेतले आहे. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी ही माहिती दिली.

काल रविवारी राज्यातील दक्षिण गोव्यातील खड्डे — पाडी येथे एका ओहोळात याच भागातील अनिशा वेळीप ही युवती निपचित सापडली होती. तर मागाहून कावरे येथे एका झाडाला गळफास लावून सर्वेश गावकर (२३) या युवकाने आत्महत्या केली होती. अनिशा व सर्वेशचे दोन वर्षांपासून प्रेम प्रकरण होते. मात्र मध्यंतरी त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. अनिशा आपल्यापासून दूर गेल्याने सर्वेशच्या मनात संशय निर्माण झाला होता. रविवारी त्याने अनिशा राहत असलेल्या ठिकाणी जाऊन कपडे धुण्यासाठी ती गेली असता, तिला पाण्यात बुडवून ठार मारले व नंतर स्वत: आपल्या गावी जाऊन आत्महत्या केली.

अनिशाच्या आईने ओहोळापाशी सर्वेशला बघितले होते. नंतर तो तेथून पळून गेला होता. पोलिसांना जेव्हा अनिशाच्या मृत्यूबदल कळाले व सर्वेशही तेथे होता असे समजल्यानंतर पोलिसांनी कावरे येथे त्याच्या घरी जाउन त्याचा शोध घेतला होता. मात्र तो सापडला नव्हते. नंतर घरापासून काही अंतरावर दूर एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला होता.




 

Web Title: After falling in love, he drowned his girlfriend and later committed suicide